‘मला दहशतवाद्यांसारखी वागणूक’, जेलमधील आझम खानांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मुलगा अब्दुल्लाचे दोन बनावट जन्म दाखले बनवल्याच्या आरोपाखाली जेलध्ये असलेले समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी आता आपले दु:ख व्यक्त केले आहे. आझम खान आणि त्यांची आमदार पत्नी आणि आमदार मुलाला रामपुरहून सीतापुर जिल्हा करागृहात हलवण्यात आले आहे. आता त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. यादरम्यान आझम यांनी म्हटले आहे की, जेलमध्ये त्यांना दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात आहे.

रामपुरच्या न्यायालयाने बुधवारी रामपुरचे समाजवादी पार्टीचे खासदार आझम, रामपुरच्या आमदार त्यांच्या पत्नी तजीन फातिमा आणि स्वारचे सपा आमदार त्यांचा मुलगा आमदार अब्दुल्ला यांना बनावट जन्म दाखला बनवल्याप्रकरणी 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी आझम यांनी मीडियाशी बोलाताना सांगितले की, संपूर्ण देश जाणतो की, आमच्यासोबत काय होत आहे.

आझम यांनी कुटुंबासह केले होते आत्मसमर्पण

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आझम, त्यांची पत्नी तजीन आणि मुलगा अब्दुल्ला यांनी अपर जिला न्यायाधीश-6 (एमपी, एमएलए) धीरेन्द्र कुमार यांच्या न्यायालयात बुधवारी आत्मसमर्पण केले होते. जेथून तिघांना न्यायालयीन कोठवडीत पाठवण्यात आले. न्यायालयाने मागील 24 फेब्रुवारीला आझम खान कुटुंबियांची अटकपूर्व जामिन याचिका फेटाळली होती आणि त्यांच्या संपत्तीच्या जप्तीचा आदेश देत अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते.

मुलाची आमदारकी झाली रद्द
बनावट दाखल्याप्रकरणी आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याची युपी विधानसभेची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. यासंबंधी जारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की, अब्दुल्ला आझमची आमदारकी 16 डिसेंबर, 2019 पासून रद्द समजण्यात येईल. अलाहाबाद हायकोर्टाने सपा नेत्याची विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचे हे आदेश दिले होते. अब्दुल्ला आझम हे स्वार मतदार संघातून आमदार होते.

काय आहे आरोप
भाजपाचे स्थानिक नेते आकाश सक्सेना यांनी मागील वर्षी दाखल केलेल्या प्रकरणात अब्दुल्ला यांचे दोन-दोन जन्म दाखले असल्याचा आरोप केला होता. एक दाखला रामपुरमधून तर दुसरा लखनऊमधून जारी करण्यात आला आहे. तपासात हा आरोप खरा ठरला आहे. रामपुर नगरपालिकेने जारी केलेल्या एका जन्म दाखल्यात अब्दुल्ला यांची जन्म तारिख 1 जानेवारी 1993 लिहिली आहे. तर दुसर्‍या जन्म दाखल्यात जन्मस्थळ लखनऊ दाखवले आहे. त्यामध्ये जन्म तारिख 30 सप्टेंबर 1990 लिहिली आहे.