home page top 1

आझम खान मुस्लिम असल्यामुळे प्रचारबंदी

रामपूर : वृत्तसंस्था – निवडणूक प्रचारसभांमध्ये जात आणि धर्माच्या नावावर मते मागत द्वेषपूर्ण प्रचार केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांना प्रचार करण्यावर अनुक्रमे तीन आणि दोन दिवसांसाठी बंदी घातली. तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगानं ७२ तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. आझम खान यांच्यावर केलेल्या या कारवाईवर आझम खान यांच्या मुलाने आक्षेप घेत धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ही कारवाई एकतर्फी असून, मुस्लीम असल्यानंच आझम यांच्यावर बंदी घातली आहे, असा आरोप त्यांचे पुत्र आमदार अब्दुल्ला यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अब्दुल्ला म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचे योगी अदित्यानाथ यांना आयोगाकडून ७२ तास प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली. यामुळे भाजप नाराज झाले. भाजपची नाराजी दूर करण्यासाठी आयोगाने माझ्या वडिलांवर बंदी घातली आहे. निवडणूक आयोगानं एकतर्फी कारवाई केली आहे. निवडणूक प्रचार बंदी घालून आवाज दाबला जाऊ शकत नाही. जातीने मुस्लिम असल्याने निवडणूक आयोगाने माझ्या वडिलांवर बंदी घातली आहे. जयाप्रदा यांच्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामध्ये कोणाचे नाव नाही. त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरोधात सोमवारी ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगानं ७२ तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे.

Loading...
You might also like