बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा ‘कर्दन’काळ, ‘या’ सिंघमने 57 जणांना दाखवला जेलचा ‘रस्ता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही संघम चित्रपट पाहिला असेल, ज्यामध्ये अजय देवगण गुन्हेगारांचे लचके तोडताना दिसला आहे. हे चित्रपटातील रियल लाईफ, पण जर का आपण वास्तविक जीवनाबद्दल बोललो तर येथे सुद्धा एक सिंघम आहे. ज्याने चंबलच्या खोऱ्यातून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा. त्यांच्या नावाने गुंड कापतात आणि गावकरी त्यांचा आदर करतात.

पोलीस अधीक्षक मृदुल कच्छवा हे राजस्थानातील बीकानेर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बीकानेर येथे झाले आणि केंद्रीय विद्यालय जयपूर येथील वरिष्ठ माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या कॉमर्स कॉलेजमधून बी.कॉम केले. बी कॉमनंतर मृदुल कच्छावा यांनी राजस्थान विद्यापीठातून एमआयबी केले. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरमधूनच सीए आणि सीएचा अभ्यास केला.

यानंतर मृदुल कच्छवा यांनीही नेटची पात्रता घेतली. त्यांनी जर्मन बँकेत वर्षभर नोकरी केली. बँकेत काम केल्यानंतर मृदुल यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले आणि अडीच वर्षे दिल्लीत राहिले. 2014 मध्ये त्यांची भारतीय टपाल सेवेत निवड झाली होती. परंतु त्यांना ते आवडले नाही. कारण त्यांना आयपीएस बनायचे होते. 2015 मध्ये मृदुल कच्छवा यांची आयपीएसमध्ये निवड झाली. त्यांची पत्नी कनिका सिंह या सीनियर आपीएस पंकज सिंग यांची मुलगी आहे.

मृदुल कच्छवा यांची जानेवारी 2017 ते जून 2017 या कालावधीत राजस्थान मधील भिलवाडाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते 2018 पर्यंत गंगानगरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. गंगानगरनंतर त्यांची अजमेर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती झाली. मृदुल कच्छवा जानेवारी 2019 ते जुलै 2019 पर्यंत लाचलुचपत विभागात कार्यरत होते. अजमेरनंतर मृदुल कच्छवा यांना धौलपुरचा पहिला जिल्हा मिळाला आणि गुन्हेगारांचा खात्मा करणं हे त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच होते.

आपल्या अल्पावधीच्या कारकिर्दीत त्यांनी प्रथमच चंबळमध्ये 57 दरोडेखोरांना पकडले आणि त्यांना तुरुंगात पाठवले. धौलपूर जिल्ह्यातील चंबळ अनेक दशकापासून बंडखोर आणि दरोडेखोरांचे ठिकाण म्हणून कुख्यात होते आणि त्यांची दहशत होती. अनेक वर्षापासून चंबळ हे दरोडेखोरांचे आश्रयस्थान मानले जात होते. चंबळच्या ओढ्यात दरोडेखोरांची बंदूक अद्याप शांत झालेली नव्हती.

काही वर्षापूर्वी दरोडेखोर फुलन देवी, मोहरसिंग, माधो सिंग, पुतलीबाई, मालखान, जगजीवन परिहार, पानसिंग यांच्यासह डझनहून अधिक देशभरातील दरोडेखोरांनी चंबळ खोऱ्यात शिरकाव केला होता. धौलपुर हे चंबळ खोरे म्हणून आधीपासून ओळखले जाते. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरील जिल्ह्यातील चंबळ खोरे दरोडेखोरांसाठी सर्वात सुरक्षित आश्रयस्थान राहिले आहे. जस जसा काळ बदलला तसतसा दरोडेखोरांच्या कार्यशैलीत आणि गुन्ह्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल झाला.

जुलै 2019 पासून आतापर्यंत पोलीस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी 57 दरोडेखोर आणि अट्टल गुन्हेगारांना कारागृहात पाठवले आहे, जे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. यामध्ये रामविलास गुर्जर आणि दरोडेखोर रघुराज गुर्जर या अट्टल दरोडेखोरांचा यामध्ये समावेश आहे. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी 22 हून अधिक दरोडेखोरांना अटक करून तुरुंगात पाठवले. 11 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मृदुल आणि त्यांच्या पथकाने दरोडेखोर आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले. त्यांच्या यशामागे सुमारे डझनभर तरुण पोलीस निरीक्षक, डीएसटी टीम, आरएसी टीम आमी सायबर सेल यांनी प्रमुख भूमिका असल्याचे मानले जाते.

पकडलेल्या दरोडेखोरांची यादी
पप्पू उर्फ जादनार गुर्जर, भारत गुर्जर, रामविलास गुर्जर, रघुराज गुर्जर, रामवीर गुर्जर, सुरेंद्र ठाकूर, जसवंत गुर्जर, विजेंद्र उर्फ राम दुलारे, विनोद उर्फ बंटी ठाकूर, गुर्जर, अजित उर्फ जीतू ठाकूर, धीरा उर्फ धीरज, विक्रांत उर्फ विक्की, नीतू, पी. मीना, सीताराम गुर्जर, श्रीभन गुर्जर, रामबाबू उर्फ छैला, रमेश गुर्जर, सुभाष गुर्जर, मोहरसिंग गुर्जर, कल्लू उर्फ बैजनाथ गुर्जर, सीताराम गुर्जर, जंदेल गुर्जर, जवान सिंह गुर्जर, भूरा गुर्जर, बनिया उर्फ रिजवान, मेहताब गुर्जर, दशरथ गुर्जर, बंटू उर्प बंटी गुर्जर, राजेंद्र कुशवाह, रामविलास उर्फ खंगार, लुक्का, पप्पू गुर्जर यासह 57 दरोडेखोरांना कारागृहात आहेत.