‘हे’ आहेत देशातील सर्वात ‘स्मार्ट’ IPS अधिकारी, ‘फिटनेस’च्या बाबतीत बॉलिवूड ‘स्टार्स’ देखील त्यांच्यासमोर ‘फिक्के’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पोलिसांच्या गणवेशात सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन आणि बर्‍याच कलाकारांना खूप पसंती मिळाली आहे, पण खऱ्या आयुष्यात एक उज्जैनचे आयपीएस अधिकारी आपल्या फिट बॉडी आणि मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ते अनेक युवकांसाठी एक फिटनेस आयकॉन बनले आहेत. या आयपीएस अधिकाऱ्याची बॉडी पाहून ही बॉडी बनविण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली याचा अंदाज येतो. हे भारताचे सर्वात फिटेस्ट आयपीएस अधिकारी बनले आहेत. सचिन अतुलकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या आयपीएस अधिकाऱ्याने खेळामध्ये देखील खूप मेडल मिळवले आहेत.

सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर

सचिन अतुलक यांच्या लोकप्रियतेचा अंदाज सोशल मिडियावर लाखो फॉलोअरमुळे येतो. त्यांचे इंस्टाग्रामवर त्याचे व्हेरीफाईड अकाउंट आहे, ज्यावर त्याने त्याचे शानदार फोटो पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर त्यांना दोन लाख लोक फॉलो करतात.

फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड स्टारही फिक्के

तंदुरुस्तीच्या बाबतीत सचिनच्या पुढे बॉलिवूड स्टारही फेल आहेत. सचिन राज्याचे एकमेव शरीरसौष्ठव अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे ते आयकॉन आहेत.

सचिन बद्दल महत्वाची माहिती

सचिन यांचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. त्यांचे वडील भारतीय वन सेवेतून सेवानिवृत्त झाले असून ते भाऊ मिलिटरीत आहेत. सचिन हे राष्ट्रीय स्तराचा क्रिकेट खेळाडूही राहिले आहेत. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळला आणि त्यात सुवर्णपदक जिंकले. सचिन अतुलकर हे २००७ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. सचिन हे फक्त वयाच्या २२ व्या वर्षी आयपीएस झाले.

आरोग्यविषयक वृत्त –