‘वसुली’ करणाऱ्या पोलिसांवर पोलीस अधिक्षकांनी केला ‘सर्जिकल स्ट्राईक’, राज्य पोलीस दलात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलीस दलातील ८५ पोलीस कर्मचाऱ्यांना अचानकपणे मुख्यालयात बोलावून त्यांना पाच दिवसांसाठी मुख्यालयातच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या पोलीस ठाण्याचे वसुलदार असून पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर ‘ट्रेनिंगचा सर्जिकल स्ट्राईक’ केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकाचवेळी एवढ्या पोलिसांना मुख्यालयात नियुक्त केले आहे. अधीक्षकांच्या हा निर्णय जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अवैध धंदेवाल्यांना पाठिशी घालणाऱ्या पोलिसांवरील सर्जिकल स्ट्रईक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मुख्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या ८५ पोलिसांना पाच दिवसात चांगले काम कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर ते कसे वागतात याचा गोपिनीय अहवाल मगवला जाणार आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस ठाण्यातील वायरलेसवर संपर्क साधून ८५ पोलीस कर्मचाऱ्याना मुख्यालयात येण्याचे आदेश दिले. यामध्ये सर्वाधीक पोलीस कर्मचारी लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील असून या पोलीस ठाण्यातून प्रत्येकी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात देखील पोलिसांना मुख्यालयात बोलावण्यात येणार असून त्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यालयात बोलावण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना योगा, मेडीटेशन, कवायत यासह विशेष बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय