पोलीस अधीक्षक सिंधू आज ‘चार्ज’ सोडणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे आज पोलीस अधीक्षक पदाचा ‘चार्ज’ आहेत. ते दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर लंडन येथे ‘पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन’ हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत. सिंधू ही आज चार्ज सोडणार असल्याने नवीन एसपी कोण, याबाबत उत्सुकता लागली आहे.

सिंधू हे आज दुपारी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात पदभार सोपवतील. त्यानंतर राज्य शासनाकडून लवकरच नवीन पोलीस अधीक्षकांची नियुक्ती केली जाईल. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू व त्यांच्या पत्नी बुलढाणा जिल्हाधिकारी निरुपमा डांगे-सिंधू यांची ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे ‘पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शासनाच्यावतीने निवड झाली आहे. त्यामुळे सिंधू हे आज पदभार सोडतील.

दुपारी त्यांच्याकडून हा पदभार अपर अधीक्षक पाटील यांच्याकडे सोपवला जाणार आहे..पोलीस अधीक्षक सिंधू यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील वाळूतस्करी, संघटित गुन्हेगारी आदींविरोधात धडक मोहीम राबवली होती. तसेच पोलिस दलातील राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. समाजविघातक, सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडाए’चा बडगा उगारण्यात आला होता.

Visit : Policenama.com