कठीण वाटणार्‍या गोष्टी ‘ऑपशन’ला टाकू नका : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –जीवनात कठीण वाटणार्‍या गोष्टी ‘ऑपशन’ला टाकू नका. अशा आवडत नसलेल्या कठीण गोष्टींचा कधी ना कधी सामना करावाच लागतो. त्यामुळे त्यावर मात करीत पुढे शिकत जा. असा सल्ला सातारा जिल्हा पोलीस सुपरिटेंडन्ट तेजस्वी सातपुते यांनी दिला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून सातपुते बोलत होत्या. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, बीबीएच्या समन्वयिका प्रा. भारती उपाध्ये, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा. रविना तांबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. प्रीती राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती.
bmcc
सातपुते पुढे म्हणाल्या, ‘सध्याच्या स्पर्धात्मक युगात आंतरशाखीय अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विशिष्ट क्षेत्रात करिअर करीत असताना, अन्य क्षेत्रांचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा झाला आहे. आयुष्यभर विद्यार्थी राहात अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे. समाजात गुणात्मक बदल करण्यासाठी स्वतःतील चांगुलपणा वाढवत नेला पाहिजे.’
bmcc
विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असल्याचे मत डॉ. कुंटे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. डॉ. रावळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. निकिता शर्मा यांनी सूत्रसंचालन, प्रा. स्मृती पटवर्धन यांनी परिचय आणि प्रा. स्वाती महानुर यांनी आभार प्रदर्शन केले.
bmcc
कनिष्ठ महाविद्यालय, बीकॉम, बीबीए, एमकॉम, पीएच. डी. आणि विविध शिष्यवृत्त्या मिळविलेल्या दोनशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
bmcc
पुरुषांनी अधिक विचारी व्हावे
महिलांचा रोज सन्मान झाला पाहिजे. महिलांना सबलीकरणाचा उपदेश करत असताना पुरुषांनी अधिक विचारी झाले पाहिजे असे मत सातपुते यांनी व्यक्त केले.
bmcc