Spa Center In Pimpri Chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक

सांगवी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते कोकणे चौकाकडे जाणाऱ्या बीआरटी (BRT) रोडलगत असलेल्या बिल्डिंगमध्ये स्पा सेंटरच्या (Spa Center In Pimpri Chinchwad) नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश (Exposed) केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.9) सहाच्या सुमारास गणेशमई बिल्डिंगमधील मंत्रा स्पा सेंटर (Mantra spa Center) येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये (Spa Center In Pimpri Chinchwad) सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

युवराज लहुराज शिंदे Yuvraj Lahuraj Shinde (वय- 24 रा. वाघेरे वाडा, नेहरु नगर, पिंपरी) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. तर प्रकाश बापु पुरूंद (वय -26 रा. नेहरु नगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग समाधान सिसोदे (PSI Pradipsingh Samadhan Sisode) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते कोकणे चौकाकडे
जाणाऱ्या बीआरटी रोडलगत गणेशमई बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील मंत्रा स्पा सेंटरमध्ये
मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन युवराज शिंदे याला अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस (Sangvi Police) करीत आहेत.

हे देखील वाचा

Murder in Chakan | पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून, पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Spa Center In Pimpri Chinchwad | One arrested for prostitution racket under spa center

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update