Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका

पिपंरी : पोलीसनामा ऑनलाइन –  वाकड (Wakad) आणि बाणेर (Baner) येथे स्पा सेंटरच्याच्या (Spa Center) नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा वाकड पोलिस स्टेशन (wakad police station) मधील अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी पर्दाफाश (Exposed) केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली असून दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी (Wakad Police) ही कारवाई गुरुवारी (दि.10) केली.
पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यामुळे पुण्याच्या वाकड आणि बाणेर परिसरातील स्पा सेंटर (spa center in wakad and baner pune) चालकांचे धाबे दणाणले आहेत.

भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर ! एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’; ‘आयपीआरसीएल’ सोबत करार

दामाजी ज्ञानेश्वर मुरडे (वय 38, रा. साई विहार, काळेपडळ, देवगीरी अपार्टमेंट जवळ, हडपसर) आणि अनिल अरुण जेना (वय-26 रा.गुजरनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
तर डेल्टीन जॅक युनिसेक्स स्पा (Deltin Jack Unisex spa) चा मालक गणेश कदम (रा. इंदापूर) हा फरार झाला आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’

बाणेर येथील माऊंटन स्टील वॉटर स्पा सेंटरवर छापा Mountain Still Water Spa

वाकडमधील द अ‍ॅड्रेस मॉल (The Address Mall) येथील गोल्डन टच रिलॅक्सो स्पा (Golden Touch Relaxo Spa) आहे. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.
त्यानंतर तेथे छापा घातला. यावेळी ग्राहकाकडून पैसे घेऊन ग्राहकाला बाणेर येथील विरभद्रनगर येथील माऊंटन स्टील वॉटर स्पा सेंटर (Mountain Still Water Spa) मध्ये पाठवले जात असल्याची माहिती मिळाली.
माऊंटन स्टील वॉटर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घालून 3 महिलांची सुटका केली.
तर स्पा सेंटर चालविणार्‍या दामाजी मुरडे याला अटक करुन वेश्या व्यवसायातून जमा केलेले 29 हजार 100 रुपये जप्त केले आहेत.

Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

वाकडमधील डेल्टीन जॅक युनिसेक्स स्पा सेंटरवर छापा Deltin Jack Spa

गुरुवारी वाकड पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत गजानन नगर, काळेवाडी फाटा येथील डेल्टीन जॅक युनिसेक्स स्पा (Deltin Jack Unisex spa) सेंटरवर छापा टाकून दोन मुलींची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी स्पा मॅनेजर अनिल जेना याला अटक केली.
तर स्पा मालक गणेश कदम हा फरार झाला. या कारवाईमध्ये 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे,
सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे-2 सुनिल टोणपे,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील,
महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे,
पोलीस अंमलदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, नितीन ढोरजे, बापूसाहेब धुमाळ, वंदु गिरे, सागर सुर्यवंशी, अतिश जाधव, कल्पेश पाटील, प्रशांत गिलबिले, तात्या शिंदे, विक्रम कुदळ, सागर सुर्यवंशी, सुरज सुतार, देवा वाघमारे, महिला अंमलदार कुदळ, अलभर यांच्या पथकाने केली.

Web Title : spa center in wakad and baner pune |
police exposed prostitute ‘racket’ operating under the
name of Deltin Jack Spa, Mountain Still Water Spa
and Golden Touch Relaxo Spa