Spa in Pimpri Chinchwad | झिया थाई स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड परिसरातील स्पा सेंटरमध्ये (Spa in Pimpri Chinchwad) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी वेश्या व्यवसाय (prostitute) चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.8) दुपारी स्पॉट-18 मॉल, पहिला मजला, शिवार चौक, रहाटणी येथील झिया थाई स्पा (Zeya Thai spa) येथे करण्यात आली.

वैष्णवी दिपक पवार (वय-27 रा. चव्हाण रेसिडन्सी, काशीद पार्क सोसायटी, प्लॅट नं. 23, पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजन गोविंद महाडीक (वय-54) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वैष्णवी पवार विरोधात भादवी 370 सह अनैतीक मानवी वाहतुक अधिनयम 3,4,5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजंट महिलेवर FIR
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवार चौकातील स्पॉट 18 मॉलमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या झिया थाई स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सेंटरवर छापा मारुन कारवाई केली.
यामध्ये पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. तर एजंट असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केला.
एजंट महिला पीडित महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत होती.
पोलिसांनी या कारवाईत 21 हजार 020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबेळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, अनिल महाजन, राजेश कोकाटे, सोनाली माने तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजन महाडीक, पोलीस अंमलदार अनिता यादव, दादा धस, अजित कुटे, प्रसाद कलाटे यांच्या पथकाने केली.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण