स्पेसएक्सचे CEO एलन मस्क यांचा दावा – अंतराळात आहे काही असे; जे सर्वकाही करत आहे नष्ट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलन मस्क यांनी अंतराळाबाबत असा दावा केला आहे की, ब्रह्मांडात काहीतरी असे आहे, जे प्रत्येक वस्तूचा विध्वंस करत आहे. एलन मस्क यांनी आशा व्यक्त केली की, त्यांची कंपनी एक दिवस 1000 स्पेसशिप पृथ्वीवरून रवाना करेल ज्यामध्ये प्रत्येकवर 100 टनाचे उपकरण आणि 100 व्यक्ती असतील. हे लोक मंगळ ग्रहावर कायम स्वरूपी वस्ती वसवण्यासाठी जातील.

मस्क यांनी यापूर्वी योजना बनवली होती की, 2050 पर्यंत अंतराळात 10 लाख लोक राहू लागतील परंतु नंतर त्यांनी मान्य केले की, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सध्या अडचण आहे. त्यांनी म्हटले की, त्यावेळी परीक्षेचा काळ असेल जेव्हा पृथ्वीवरून काही कारणामुळे स्पेस शिप येणे बंद करतील. अशावेळी मंगळ ग्रहावर राहणारे लोक मरतील ? त्यांनी म्हटले की, जर असे झाले तर याचा अर्थ आपण सुरक्षित ठिकाणी नाही.

स्पेसएक्सच्या सीईओंनी ग्रेट फिल्टर सिद्धांताचा संदर्भ दिला जो प्रोफेसर रॉबिन हँसन यांना दिला होता. प्रोफेसर रॉबिन यांनी म्हटले होते की, अंतराळात काही असे आहे जे संपूर्ण अंतराळात जीवनाच्या विस्तारापूर्वीच त्यास नष्ट करत आहे. प्रोफेसर रॉबिन यांनी 2014 मध्ये म्हटले होते की, हे अंतराळ खुप विस्तृत आहे, अंधाराने भरलेले, थंड, रिकामे आणि मृत आहे. आपण कुठेही पाहतो, ते पूर्णपणे मृतावस्थेत आहे.

प्रोफेसर रॉबिन यांनी म्हटले की, जर तुम्ही एलियन्सला पहिले तर तुम्ही त्यांना घाबरू शकता, तुम्हाला हा विचार करून आश्चर्य वाटेल की, ते तुमच्यासोबत कसे वागतील. तुम्हाला आणखी तेव्हा घाबरले पाहिजे, जेव्हा एखादा एलियन दिसणार नाही, तुम्हाला काहीच दिसणार नाही. या सिद्धांताच्या आधारावर प्रोफेसर रॉबिन यांनी म्हटले की, अंतराळात काही असे आहे जे प्रत्येक वस्तू नष्ट करत आहे आणि आपण पुढील बळी असू शकतो.