SpaceX नं रचला इतिहास, 4 अंतराळ प्रवाशांना पाठवलं अंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्पेसएक्सने फाल्कन रॉकेटद्वारे चार अंतराळ प्रवाशांना अंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) ला पाठवले आहे. हे नासाचे पहिले असे मिशन आहे, ज्यामध्ये अंतराळ प्रवाशांना आयएसएसवर पाठवण्यासाठी एखाद्या खासगी अंतराळ यानाची मदत घेतली आहे. फाल्कन रॉकेटने रविवारी रात्री तीन अमेरिकन आणि एक जपानी नागरिकांला घेऊन केनेडी अंतराळ केंद्रातून उड्डाण घेतले.

स्पेसएक्सच्या यानातून दुसर्‍यांदा अंतराळ प्रवाशांना रवाना करण्यात आले आहे. या ड्रॅगन कॅप्सूल यानाला याच्या चालक दलाच्या सदस्यांनी 2020 मध्ये जगभरात आलेल्या आव्हानांना पाहता ‘रेसिलियन्स’ नाव दिले आहे. यान प्रक्षेपणाच्या नऊ मिनिटानंतर आपल्या कक्षेत पोहचेल. हे सोमवारी अंतराळ स्टेशनमध्ये पोहचण्याची अपेक्षा आहे आणि ते वसंत ऋतूपर्यंत तिथे राहील.

कमांडर माईक हॉपकिन्स यांनी प्रक्षेपणाच्या अगोदर म्हटले की, या अवघड काळात मिळून काम करत, आपण देश आणि जगाला प्रेरित केले आहे. या शानदार यानाला रेसिलियन्स नाव देण्यात आले आहे. स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी एलन मस्क हे कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याने त्यांना लांबूनच यावर लक्ष ठेवावे लागले.

कॅप्सूल कक्षेत पोहचताच कॅलिफोर्नियामध्ये स्थित स्पेसएक्स मिशन कंट्रोलमध्ये उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या. या प्रक्षेपणामुळे अमेरिका आणि अंतराळ स्टेशनदरम्यान चालक दलाच्या सदस्यांची आळीपाळीने येण्या-जाण्याच्या दिर्घ साखळीची सुरूवात होईल.

अधिकार्‍यांनी सांगितले की, जास्त लोकांचा अर्थ आहे की, प्रयोगशाळेत शास्त्रीय संशोधन होईल. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रीय अंतराळ परिषदेचे अध्यक्ष माईक पेन्स यांनी नासा प्रशासक जिम ब्रिडनस्टीन यांच्यासोबत प्रक्षेपण पाहिले. पेन्स यांनी म्हटले, याच्या प्रक्षेपणानंतर सुमारे एक मिनिटापर्यंत माझा श्वास थबकला होता.

अंतराळ स्टेशनवरून उड्डाण घेणार्‍या प्रवाशांमध्ये अमेरिकन हवाई दलाचे कर्नल माईक हॉपकिन्स, नौदल कमांडर व्हिक्टर ग्लोव्हर, भौतिक शास्त्रज्ञ शॅनन वॉकर आणि जपानी अंतराळ प्रवाशी सोइची नोगुची यांचा सहभाग आहे. या चार अंतराळ प्रवाशांच्या अगोदर कजाखीस्तान येथील मगील महिन्यात दोन रशियन आणि एका अमेरिकेन प्रवाशाने अंतराळासाठी उड्डाण घेतले होते.