विज्ञान सोप्या पध्दतीनं शिकवण्यासाठी शिक्षिकेनं घातला ‘बॉडीसूट’, ‘ते’ पार्ट पाहून सगळेच ‘खूश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भारतात विद्यार्थ्यांना विज्ञान कसे शिकवायचे हे मोठे आव्हानच आहे असं म्हणलं तर चूकीचे ठरणार नाही. असे असताना स्पेनच्या शाळेतील एका शिक्षिकेने मुलांना शिकवण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. या शिक्षकेने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा जो मार्ग शोधला याचा कौतूक करावं तेवढं कमीच. सोशल मिडियावर देखील या शिक्षिकेची वाह वाह होत आहे.

एका वृत्तानुसार वेरोनिका ड्यूक 15 पेक्षा जास्त वर्षांपासून शाळेत शिकवत आहेत. त्या सध्या विज्ञान, कला, सामाजिक, इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध विषयांमध्ये तिसरीतील मुलांना शिकवतात. परंतु जेव्हा 43 वर्षीय वेरेनिका बॉडीसूट घालून बायोलॉजीच्या वर्गात गेल्या तेव्हा त्या मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांचे फोटो पाहिल्यानंतर सगळेच विद्यार्थी आश्चर्यचकित झाले.

या शिक्षिकेने सांगितले की, तिने इंटरनेटवर या विचित्र दिसणाऱ्या बॉडीसूटची जाहिरात पाहिली. त्यानंतर तिने निर्णय घेतला की या माध्यमातून विद्यार्थ्यांना बायो मजेदार आणि सुलभ करुन शिकवायचे. वेरोनिका म्हणाल्या की, मानवी शरीराची माहिती देणं आणि ते विद्यार्थ्यांना समजावून सांगणं कठीण जातं, त्यामुळे मला वाटलं की असा प्रयत्न केला जाऊ शकतो, जेणेकरुन विद्यार्थी मानवी शरीराची रचना लवकर आणि व्यवस्थित समजून घेतील.

वेरोनिका आणि त्यांचे पती वर्गात गेले आणि बॉडीसूटसह काही फोटो देखील काढले, त्यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि आता ते सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सध्या या फोटोंना 13,000 पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले आहे तर 66,000 लाइक्स मिळाल्या आहेत.

या ट्विटला कॅप्शन देऊन माईक मोरॅटिनोस यांनी लिहिले की, वेरोनिका माझी पत्नी असल्याचा मला अभिमान आहे, मी भाग्यवान आहे. आज तिने तिच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थी देखील आता वेरोनिकाची आठवण काढत आहेत.

हे काही पहिल्यांदा झालं नाही. वेरेनिका कायमच विद्यार्थांना शिकवण्यासाठी आऊट ऑफ दि बॉक्स जाऊन विविध फंडे अजमावते. यापूर्वी तिने इतिहासाचे धडे, व्याकरण, असे विषय शिकवताना विविध मुकूट वापरले होते. यामागे त्यांचा दृष्टीकोन आहे की समाजात कंटाळवाण्या आणि आळशी समजल्या जाणाऱ्या शिक्षकांबद्दलचे विचार बदलले पाहिजेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/