Video : वायनरीत आला चक्क वाईनचा महापूर, 50 हजार लिटर वाईन वाहून गेली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – स्पॅनिश वायनरीत तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे 50 हजार लिटर वाइन ओसंडून वाहून गेली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्पेनच्या वायनरीत व्हॅलामेलिआ या ठिकाणी असलेल्या बोडगेजेस विट्टविनोस वायनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर 50 हजार लिटर वाइनचे पाट वाहिले आहेत.

कारखान्यात तांत्रिक बिघाड झाल्याने वायनरीमधून वाईनचे अक्षरशः पाट वाहिले. मोठ्या प्रमाणावर वाईन वाहून जमिनीवर आली. स्पेनमधली ही वायनरी 1969 मध्ये सुरु करण्यात आली. 1570 हेक्टर जागेवर ही वायनरी आहे. जेव्हा इतक्या जुन्या वायनरीत बिघाड झाला तेव्हा सगळीकडे वाईनच वाईन पसरल्याचे दिसून आले. यासंबंधीचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी यासंबंधी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या घटनेत जे नुकसान झाले त्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like