Spartan Monsoon League | दुसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब, ऑरेंज आर्मी क्लब संघांची तिसर्‍या विजयाची नोंद !!

पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब (Spartan Cricket Club) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ (Spartan Monsoon League) अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (T20 Cricket Tournament) ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब (Braveheart Cricket Club) आणि ऑरेंज आर्मी क्लब (Orange Army Club) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत तिसर्‍या विजयाची नोंद केली. (Spartan Monsoon League)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर (Kodre Farms Cricket Ground, Sinhagad Road) सुरू असलेल्या या स्पर्धेत गननायक सिंग (Gannayak Singh) याच्या अफलातुन गोलंदाजीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबचा (Scorpions Cricket Club) ४८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना नेल्सन एरीक (३३ धावा), गिरीष कोंडे (२९ धावा) आणि जय ढोले (२७ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने १६८ धावा धावफलकावर लावल्या. ब्रेव्हहार्टच्या गननायक सिंग याने १८ धावात ५ गडी बाद करून स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबचा निम्मा संघ तंबूत पाठवला. स्कॉर्पियन्स् संघाचा डाव १२० धावांवर आटोपला. सनी मोरे यानेही (३-३०) दुसर्‍या बाजुने फलंदाजांना जखडून ठेवले. (Spartan Monsoon League)

विपुल खैरे याच्या ६३ धावांच्या स्फोटक फलंदाजीमुळे ऑरेंज आर्मी क्लबने एकदंत क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एकदंत क्रिकेट क्लबने १८.१ षटकात १५४ धावांचे आव्हान उभे केले.
कुंज दिक्षित (३४ धावा) आणि मुकूल खैरे (३४ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.
विपुल खैरे याच्या १८ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ६३ धावांच्या खेळीमुळे ऑरेंज आर्मी क्लबने हे आव्हान ९.५ षटकात पूर्ण केले.
अमित गणपुले याने नाबाद ३६ धावा आणि आशिष घमांडे २० धावांची खेळी केली व सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १६८ धावा (नेल्सन एरीक ३३, गिरीष कोंडे २९, जय ढोले २७,
शैलेश सातव २-१८) वि.वि. स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबः १५.५ षटकात १० गडी बाद १२० धावा
(समीर जोशी नाबाद ३५, शैलेश सातव १३, गननायक सिंग ५-१८, सनी मोरे ३-३०); सामनावीरः गननायक सिंग;

एकदंत क्रिकेट क्लबः १८.१ षटकात १० गडी बाद १५४ धावा (कुंज दिक्षित ३४, मुकूल खैरे ३४, सिद्धांत सिंग २४,
विपुल खैरे ४-१७, अभिषेक बोधे २-१५) पराभूत वि. ऑरेंज आर्मी क्लबः ९.५ षटकात ४ गडी बाद १५८ धावा
(विपुल खैरे नाबाद ६३ (१८, ४ चौकार, ७ षटकार), अमित गणपुले नाबाद ३६, आशिष घमांडे २०,
सुदर्शन गुणे ३-४२); सामनावीरः विपुल खैरे.

Web Title :- Spartan Monsoon League | 2nd ‘Spartan Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament; Braveheart Cricket Club, Orange Army Club Teams Record 3rd Victory !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा