‘मेंदू आणि व्यक्ती विकास’वर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवार, दिनांक २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

तासनतास मोबाईल हातात धरून गेम खेळणाऱ्या टीनएजर्सच्या मेंदूत नक्की काय घडतंय ? मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ नावाचा भाग काय विचार करतो? गेम खेळण्याच्या आणि सोशल मीडियाच्या लालसेतून मोबाईल- इंटरनेट व्यसन होते का ? आणि व्यसनी माणसाच्या मेंदूतला ‘ग्रे मॅटर’ संकुचित होतो का ? त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो ? अशा अनेक प्रश्नांचा वेध डॉ. श्रुती पानसे आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. तेव्हा अधिकाधिक विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.