सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचे काम सूरु, सरकार पुन्हा आल्यास ‘तो’ नियमही काढू : नरेंद्र मोदी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचे काम सूरु झाले आहे. काही जणांच्या खात्यात जमाही झाले असतील. आणि ज्यांच्या खात्यात आणखी जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नका तुमच्याही खात्यात लवकर जमा होतील. असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. नाशिक येथील आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच २३ मेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आणि मोदी सरकार पुन्हा आले तर ५ एकर शेतीचा जो नियम आहे. तोही काढण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. उद्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दीड लाख गावांमध्ये वेलनेस सेंटर उभारणी केली जात आहे.

वेगवान स्थितीत देशात रस्ते आणि गावागावात मोफत वीज पुरवठा सुरू केला. देशातील प्रत्येक गावातील पोस्ट बँकिंग सुधारणा करून गरिबांना सुविधा देत आहोत. नाशिक जिल्ह्यात उडाण योजनेद्वारे वायूमार्ग अधिक सक्षम करत आहोत. नाशिकला लवकरच द्रायपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणार. आदिवासींच्या शिक्षणासाठी देशभरात एकलव्य शाळा सुरू करत आहोत. वनउपज ला समर्थन मूल्य मिळून देत आहोत. तसेच भारतातील प्रत्येक गरीब कुटूंबाला 5 लाखांचा उपचार मोफत पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मोदींचा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यामधील माध्यस्थांविरुद्ध आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पारंपरिक प्रथा मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात मूल्य सरकार कमी करणार आहे. विशेष म्हणजे, महागाई वाढताच काँग्रेस आपल्या पध्दतीने गोंधळ घालत गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात अन गैर वापर करून घेतात. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, काँग्रेस गोदावरीचे पाणी गुजरातला वळविण्याच्या मुद्द्यावर अफवा पसरवत आहे. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नका. इथले पाणी कुठेही जाणार नाही हे मी सार्वजनिकदृष्ट्या जाहीर करत आहे.असेही त्यांनी म्हंटले.