आता शत्रू शंभर वेळा विचार करतो : नरेंद्र मोदी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात देशात सर्रास बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळीस उत्तरही लवकर दिले जायचे नाही. आणि आता आपल्या देशाकडे पाहायला शत्रू शंभर वेळा विचार करतो. कारण त्यांनाही माहित आहे की हे घरात घुसून मारतात म्हणून. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. उद्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का आहे त्या ठिकाणी बसतो आणि शिवराळपणा ते करू लागतात. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले. याचबरोबर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात देशात सर्रास बॉम्बस्फोट व्हायचे. त्यावेळीस उत्तरही लवकर दिले जायचे नाही. आणि आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्या आगोदर शत्रू शंभर वेळा विचार करतो. कारण त्यांनाही माहित आहे की हे घरात घुसून मारतात. मी मागील निवडणुकीतच सांगितले होते डोळ्यात डोळे घालून बोलणार हे, त्याचा प्रत्यय या पाच वर्षांत आला असेल. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, भाजपा सत्तेत आल्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यात होणारे बॉम्बस्फोट थांबले. आतंकवाद्यांच्या कारखान्यात घुसून तळ उध्वस्त करून भारतीय वायू सेना सुरक्षित पुन्हा परतली. असेही त्यांनी म्हंटले.