Pune News : सहकार खात्यामधील विशेष लेखा परिक्षक ललितकुमार भावसार 30 हजाराची लाच घेताना अँटी करप्शन च्या जाळ्यात, सहकार खात्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सहकार खात्यामधील एका विशेष लेखा परिक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

ललितकुमार भालचंद्र भावसार (वय ५५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुण्यातील सहकारी संस्था येथे लोकसेवक ललीतकुमार हे विशेष लेखा परिक्षक आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील आणि ऑडिटर आहेत. ऑडिटर पॅनलमधून त्यांचे नाव न काढण्यासाठी लोकसेवक ललीतकुमार ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत ACB कडे तक्रार केली होती. त्याची पडताळली केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्यानुसार आज सापळा कारवाईत तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अधिक कारवाई सुरू आहे.