पुणे पोलीसांच्या सेवा उपक्रमाला ‘विशेष पुरस्कार’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (आयसीसी) राष्ट्रीय पातळीवरील इम्पॉवरींग द रुरल पॉप्युलेशन’ दिला जाणारा विशेष पुरस्कार यंदा पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीला देण्यात आला आहे. कोलकत्ता येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या महिला व बालविकास मंत्री शशी पांजा व इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राखी सरकार यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण व महिला
pune police 1

पोलिस कर्मचारी पुजा भगत यांनी हा पुरस्कार पुणे पोलिसांच्या वतीने स्वीकारला. पुरस्कारासासाठी 40 संस्थांनी सादर केलेल्या उपक्रमांमधून पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीची प्रेक्षकांनी निवड केली आहे.
पुणे पोलीसांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची माहिती या सेवा उपक्रमाअंतर्गत घेतली जाते. त्यामाध्यमातून पोलीस आयुक्त पातळीवर त्या तक्रारदारास फोनकरून त्यांचे समाधान झाले का याची विचारपूस होते. यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे. या उपक्रमाअंतर्गत तक्रार देण्यासाठी आलेल्या नुकताच दोन लाख नागरिकांचा टप्पा पार केला आहे. याचे राज्यपातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे. इम्पॉवरींग द रुरल पॉप्युलेशन या घटकाअंतर्गत दिल्या जाणार्‍या विशेष पुरस्कारासाठी विविध संस्थांकडून सामाजिक सबलीकरणाकरीता राबविण्यात येणार्‍या उपक्रमाकरीता पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी देशभरातून 40 संस्थांनी त्यांचे सामाजिक सबलीकरणासाठीचे उपक्रम सादर केले होते.

संबंधीत उपक्रमाचे सादरीकरणास पारितोषिक प्राप्त होण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी दिलेल्या मतांवरुन अंतिम निवड होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी सेवा उपक्रमाची माहिती देणारे दृकश्राव्य सादरीकरण केले. त्यानुसार, 40 सादरीकरणातून सेवा उपक्रमाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.