अरुण शौरी यांच्या विरूद्ध FIR चा आदेश, ‘भ्रष्टाचार’ आणि ‘फसवणूकी’चे आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्याविरूद्ध एफआयआरचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्यामार्फत अरुण शौरीविरूद्ध भ्रष्टाचार आणि फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अरुण शौरी यांच्याविरूद्ध राजस्थानातील जोधपूर येथे सीबीआयचे विशेष न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी कारवाई केली. अरुण शौरीविरोधात भ्रष्टाचार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वास्तविक शौरीवर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉटेलच्या विक्रीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे प्रकरण राजस्थानमधील उदयपुरच्या लक्ष्मी विलास पॅलेस हॉटेलशी संबंधित आहे. अरुण शौरी यांच्यावर 252 कोटी रुपयांच्या हॉटेलच्या साडेसात कोटी रुपयांमध्ये निर्गुंतवणुकीचा आरोप आहे. त्याचबरोबर उदयपूर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हॉटेल ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अरुण शौरी कोण आहे?

भाजपाचे राज्यसभेचे माजी खासदार अरुण शौरी हे 1999-2004 दरम्यान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील तत्कालीन सरकारमध्ये केंद्रीय संचार, माहिती तंत्रज्ञान आणि निर्गुंतवणूक मंत्री होते. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित शौरीने 1967 ते 1978 दरम्यान जागतिक बँकेमध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम केले आहे. अरुण शौरी हे ‘द इंडियन एक्सप्रेस’ चे संपादकही राहिले आहेत.