Pune : दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘पीएमपी’कडून सर्वसामान्यांसाठी खास गिफ्ट ! 5 रूपयांमध्ये करा 5 किलोमीटर प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे महानगर प्रादेशिक परिवहन महामंडळाने (PMPML) दस-याच्या मुहूर्तावर खास प्रवाशांसाठी भेट (special-gift) आणली आहे. या भेटीत नागरिकांना स्वस्त आणि मस्त प्रवासाची संधी मिळणार आहे. पीएमपीएमएलने फक्त 5 रुपयांत 5 किलोमीटर ही प्रवास ही प्रवाशांसाठी नवी योजना बुधवारी (दि. 21) जाहीर केली आहे. दस-याच्या मुहूर्तावर (dussehra) या सेवेला सुरुवात होणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक 5 मिनिटांनी या सेवेत गाड्या उपलब्ध होतील,असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असून सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार आदीच्या प्रवाशासाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पीएमपीएमएल ने प्रवास करणारा मोठा वर्ग शहरात आहे.

अटल प्रवासी योजना म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यंत प्रवाशी नेणारी पूरक प्रवासी योजना आहे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात एक मध्यभाग निश्चित करून त्याच्या 5 किलोमीटर परिघात विविध स्थानकावर गाड्या जातील. तेथून प्रवाशी त्यांना हव्या असलेल्या लांबल्याच्या गाडीने जातील.

पुण्यात महापालिका इमारत व पिंपरी- चिंचवडमध्ये चिंचवड हा मध्यभाग असणार आहे. पुणे महापालिकेपासून 5 किलोमीटर परिघात 9 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. फक्त 5 रुपयांत येथून कोणत्याही मार्गावर जाता येईल. या सर्व गाड्या मिडी म्हणजेच लहान गाड्या आहेत. 180 गाड्या यासाठी वापरण्यात येणार आहेत. दर 5 मिनिटांनी या गाड्या असणार आहेत. त्यासाठी कमी उत्पन्नाच्या मार्गावरील काही गाड्या कमी केल्या आहेत. पण त्यात प्रवाशांची अडचण होणार नाही, तसेच पीएमपीएमएलचे उत्पन्न बुडणार नाही याची काळजी घेतली असल्याचे जगताप म्हणाले. या शिवाय नवीन 37 मार्ग सुरु करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.