विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) प्रताप दिघावकर यांच्या पत्नी अस्तिमा यांचे आज (मंगळवार) सकाळी अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे दिघावकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

अस्तिमा प्रताप दिघावकर (51)  या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (प) येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अत्यंत मनमिळावु स्वभावाच्या अस्तिमा दिघावकर या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या माजी पदाधिकारी होत्या. घरातील बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान त्याचा वैदकीय तपासणीमध्ये हृदयविकारने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Loading...
You might also like