उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागानं दिल्या ‘या’ विशेष सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात उन्हाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. तर देशातही उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उष्मघाताने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. राजस्थान, चुरु येथे ५० डीग्रीहून अधित तापमान आहे. तर मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, चंदीगड या राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भात उन्हाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हाची दखल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून घेतली आहे. आरोग्य विभागाने उन्हापासून नागरिकांशी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसंच त्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत.

आरोग्य विभागाने पुढील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

१. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यप्राशन सर्वप्रथम टाळा. हे पदार्थ उष्ण स्वरूपाचे असतात.
२. मोकळी कपडे आणि फिक्या रंगाची कपडे वापरा
३. गरज असेल तरच घराबाहेर पडा,
४. दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
५. दररोज चार ते पाच लीटर पाणी प्या
६. डोक्यावर छत्री, टोपी, रुमाल वापरावा
७. मीठ असलेले ज्यूस, थंड पेय ,लिंबू रस, ओआरएस प्या
८. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास होत असेल तर घराबाहेर पडू नये.
९. थंड ठिकाणी थांबावे, पंखा, कूलरचा वापर करा.

अशा सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांसह पशू-पक्ष्यांचेही हाल होत आहे. उष्णतेमुळे देशासह राज्यात दुष्काळजन्य परिस्थीती आहे. अनेक उष्मघाताचे बळी झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून बचाव व्हावा यासाठी आरोग्य विभागाने स्वतः पुढाकार घेत या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व नागरिकांनी पाळाव्यात आणि उन्हापासून आपला बचाव करावा.