काय सांगता ! होय, लग्नानंतर ‘नवरी’ ला चक्क सायकलवर घेऊन केला 25 KM चा प्रवास, गर्भ’ श्रीमंत’ तरुणाचं ‘कृत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका श्रीमंत कुटूंबातील तरुणाने साधे लग्न करण्याचा असा काही आदर्श समोर ठेवला ज्यांची सर्वांनीच प्रेरणा घ्यायला हवी. ना कोणतेही वाजंत्री, न कोणताही डीजे, फक्त गुरुद्वारा साहब मध्ये विवाह आणि थेट आपल्या नवं वधूला घेऊन सायकलवरुन घरी. हा आदर्श ठेवणारा विवाह पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात पार पडला. भटिंडा जिल्ह्याच्या मोड मंडईमध्ये रामनगरमध्ये राहणाऱ्या गुरबख्शीश सिंह, ज्यांच्याकडे 40 एकरची जमीन आहे एवढच नाही तर आपल्या आई वडीलांचा एकुलता एक लेक. प्रदूषण टाळण्यासाठी आणि समाजात एक संदेश देणारे त्यांचे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. त्याच्या वारातीत फक्त 12 लोक सहभागी होते. ते देखील कुटूंबात फक्त काही खास नातेवाईक.

वरात थेट गुरुद्वारात गेली. त्यानंतर आनंद नावच्या एका कार्यालयात विवाह झाला आणि नवरा आपल्या नवरीला घेऊन थेट सायकलवर बसवून 25 किलोमीटराचा प्रवास करुन आपल्या गावी घरी घेऊन आला. नवऱ्या मुलाने सांगितले की त्यांनी लहानपणापासून ठरवले होते की लग्नात होणाऱ्या बेसुमार खर्चावर पैसा वाळ्या घालवायचा नाही. ना की गाणी वाजणार ना की लग्नात हुंडा घेण्यात येईल. लहानपणी ठरवलेल्या स्वप्नाला मी साकार केले. यामुळे दोन्ही कुटूंबाला कोणताही खर्च करण्याची गरज भासली नाही.

नवऱ्या मुलाच्या बहिणीने सांगितले की लहानपणापासून माझ्या भावाची इच्छा होती की हुंडा घ्यायचा नाही. मोठा खर्च करुन लग्न नको आणि सायकलीने नवरी मुलीला घरी घेऊन येणं. त्याने आपली लहानपणाचे स्वप्न साकार केले. गुरुद्वार साहिबमध्ये झालेल्या या विवाहात 12 कुटूंबातील लोक होते. तेथूनच सायकलवर बसवून नवऱ्या मुलाने सायकलीवर सासरी आणलं. या विवाहात दोन्ही कुटूंबाच्या खर्च वाचला. समाजात शिकल्या सवरलेल्या लोकांना असे काही चांगले निर्णय घेतले तर असे अनेक आदर्श समाजासमोर येईल.

Visit : Policenama.com