खुशखबर ! ‘हज’ यात्रेकरुंच्या सुविधेसाठी हे ‘अ‍ॅप’, प्रवासात करेल ‘मदत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता हज यात्रेकरुंसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ज्याची सुविधा हज यात्रेकरुंना प्रवास करताना होणार आहे. या अ‍ॅपचा यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. काऊंसिल जनरल ऑफ इंडिया कडून हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून ‘हाजी इन्फरेमेशन सिस्टीम’ नावाचे हे अ‍ॅप असणार आहे.

लॉन्च करण्यात आलेल्या या अ‍ॅपमधून हज यात्रेकरुंना येणाऱ्या अडचणींपासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हज यात्रेला जाणाऱ्या विमानापासून ते मदिनामधील स्थळापर्यंत सर्व काही बाबींंची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. याच अ‍ॅपच्या आधारे यात्रेकरु हज सेवकांशी संपर्क साधू शकतील.

हा आहे टोल फ्री नंबर
स्टेट हज समितीचे सचिव राहुल गुप्ता यांनी सांगितले की, या अ‍ॅपच्या आधारे यात्रेकरु भारतीय कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकणार आहेत. यासाठी एक आपत्कालीन टोलफ्री नंबर सुरु करण्यात आला आहे. ८०००२४७७७८६ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून हज यात्रेकरु आपल्या अडचणी दूर करु शकतात. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

रुग्णालय, हॉटेल्सची देखील माहिती मिळणार
या अ‍ॅपच्या आधारे हज सेवक कुठे आहेत. हज यात्रेकरुंसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत. हे कळू शकणार आहे. यात रुग्णालय, हॉटेल्स आणि इतर सुविधांची माहिती देखील मिळणार आहे. हे अ‍ॅप उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात तुम्ही या भाषांमधून फिडबँक देऊ शकतात.

यासाठी तुम्हाला या अ‍ॅपमध्ये कव्हर क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही याचा वापर करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या