Drugs Case : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर ! NDPS कोर्टाकडून तात्पुरता दिलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) याला ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस (NDPS) कोर्टानं आज (बुधवार, दि. 2 डिसेंबर) जामीन अर्ज मंजूर केला आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला अटक केली होती. यात अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचीही नावं समोर आली होती. यानंतर अनेकांची चौकशी झाली. यानंतर काही ड्रग्स तस्करांसह रिया आणि शौविक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

रिया आणि शौविक यांनी तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्यानंतर रिया जामिनावर बाहेर आली होती. परंतु भाऊ शौवकिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर शौविकनं 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तब्बल 4 वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता तरी त्याची सुटका होईल, अशी रियाला अपेक्षा होती. शौविकला ड्रग्ज बाळगणं, खरेदी करणं, विक्री करणं अशा गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली होती.

न्यायालयाच्या त्या निर्णयावर जामिनासाठी खटपट

शौविकनं 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी एका आदेशात म्हटलं होतं की, एनसीबी अधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब अद्याप कोर्टानं स्वीकारलेला नाही. अशात आरोपींना जबरदस्ती तुरुंगात ठेवता येणार नाही. यानंतर पुन्हा एकदा शौविकची जामिनासाठी धडपड सुरू झाली होती.

You might also like