‘या’मुळे साध्वी प्रज्ञासिंह यांची ‘ही’ मागणी NIA न्यायालायने केली मान्य

मुंबई : वृत्तसंस्था – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष एनआयए न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट देण्यात आली आहे. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने सूट मिळण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.

विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीला आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिले होते. मात्र मी आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहू शकते. परंतु आपल्याला काही काळासाठी हजर राहण्यासंदर्भात सूट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु त्यांची ही मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली होती. परंतु सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने त्यांना न्यायालयात हजर राहण्याची संदर्भात सूट देण्यात आली आहे.

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
२००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांना याप्रकरणात एनआयय न्यायालयाने त्यांची सुटका केली. त्यानंतर याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी यासंदर्भात सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकराणातील एकही आरोपी सध्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहात नसल्याने एनआयए विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत