मालेगाव बॉंबस्फोट प्रकरण ; खा. प्रज्ञा ठाकूरचा अर्ज NIA विशेष न्यायालयाने फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप खासदार आणि मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूरला NIA च्या विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मुंबईच्या विशेष NIA न्यायालयाने साध्वीने केलेल्या एका आठवड्यात एका वेळेस उपस्थित न राहण्याच्या अर्जाला रद्द केले आहे. साध्वीला आठवड्यातुन एका वेळेस उपस्थित राहण्याचे सक्तीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संसदेच्या कामात सहभागी होण्यासाठी केला होता अर्ज
प्रज्ञा ठाकूर यांनी सवलत मिळावी यासाठी करण्यात आलेल्या अर्जामध्ये म्हंटले होते की, मी खासदार आहे आणि मला आता संसदेच्या दैनंदिन कामात सहभागी होणे आवश्यक आहे. तरीही न्यायालयाने प्रज्ञाला फक्त एका दिवशी गुरुवारी २० जूनला न्यायालयात उपस्थित न राहण्याची सवलत दिली होती.

मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूरला आठवड्यातून एका वेळेस NIA च्या विशेष न्यायालयात उपस्थित रहावे लागते. या निर्णयाविरोधात प्रज्ञा यांनी याचिका दाखल करून कायमची सुटका करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. आता खासदार असल्याने संसदेच्या दैनंदिन कामकाजाला उपस्थित रहाणे आवश्यक असल्यामुळे आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित रहाणे अशक्य आहे, त्यामुळे सुनावणीतून माझी कायमची सुटका करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रज्ञा ठाकूरने केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा