‘या’ कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खास प्लॅन्स ! कोरोना काळात फ्री मोबाइल Recharge

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात यंदाच्या कोरोना संकटाने लोकांना हतबल करून टाकलं आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय रोजगारावर गदा आली आहे. यामुळे आर्थिक बाजू बिघडली आहे. अनेक सर्वसामान्य माणसाला साधं मोबाईल रिचार्जे करण्यासाठीही पैशाची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून भारतातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी काही विशेष सुविधा आणल्या आहेत. BSNL, Airtel, Vodafone-Idea, JIO या कंपन्यांनी काही विशेष योजना जाहीर केल्या आहेत.

BSNL :
BSNL ने ग्राहकांच्या योजनांची वैधता १ एप्रिल अथवा त्यानंतर संपली आहे. त्यांना ती ३१ मेपर्यंत वाढवून दिली आहे. जे प्रीपेड युझर्स कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळानं प्रभावित झाले आहेत आणि एक एप्रिलनंतर रिचार्ज करू शकलेले नाहीत त्यांना ३१ मे पर्यंत मोफत वैधतेचा लाभ मिळणार आहे. तसेच कंपनीने या ग्राहकांना १०० मिनिटांचा मोफत Talktime सुद्धा दिलाय. १०७, १९७ रुपये आणि ३९७ रुपयांचा प्लॅनची सुविधा दिलीय.

Jio :
जिओने ग्राहकांसाठी कोविड रिलीफ ऑफर जाहीर केलीय. यात आउटगोइंग कॉलसाठी ३०० मिनिटं विनामूल्य आणि Double data लाभांसह २ नवीन प्लॅनही दिल्या आहेत. यामध्ये Jio ने आपल्या ग्राहकांना दररोज १० mnt विनामूल्य दिली असून त्यामुळे ग्राहक महत्त्वपूर्ण फोन करू शकणार आहे. सर्वसामान्य अथवा अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. Jio फोनने ३९ आणि ६९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन देखील आणले आहे. यात १४ दिवसांच्या वैधतेसह data आणि calling चे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये Buy one get one offer आहे.

३९ रुप्याच्या प्लॅनमध्ये १०० MB हायस्पीड Data आणि Unlimited Calling सुविधा आहे. १४ दिवसाची व्हॅलिडिटीअसून हाय स्पीड data समाप्त झाल्यानंतर ६४ KBPS स्पीडने DATA मिळतो. तसेच, ६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ०. ५ GB चा हाय स्पीड DATAआणि Unlimited Calling उपलब्ध आहे. १४ दिवस वैधता यात ७ GB DATA मिळणार आहे. हाय स्पीड DATA समाप्त झाल्यानंतर ६४ KBPS स्पीडने DATA मिळतो. या दरम्यान, २८ दिवसाच्या वैधतेवर ७५, १२५, १५५, १७५ आणि १८५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सवरही Buy one get one offer उपलब्ध आहे.

Airtel :
Airtel या भारतातील सर्वात मोठ्या नेटवर्क प्रोव्हायडर कंपनीनं आपल्या ५.५ कोटींपेक्षा अधिक सर्वसामान्य अथवा अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना ४९ रुपयांचा प्रीपेड recharge विनामूल्य दिला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० MB DATA आणि ३८ रुपयाचा टॉकटाइम दिला आहे. यात २८ दिवसांची वैधता आहे. तसेच ७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२८ रुपयांचा टॉकटाइम आणि २०० MB DATA दिला आहे. STD कॉलसाठी प्रति मिनिट ६० पैसे शुल्क आहेत.

Vodafone-Idea :
यामध्ये ४९ आणि ७९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स जाहीर केले आहेत. ४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० MB DATA आणि ३८ रुपयांचा टॉकटाइम दिला आहे. यामध्ये २८ दिवसांची वैधता आहे. तसेच २८ दिवसांची वैधता असलेल्या ७९ रुपयांच्या प्लॅनचे Combo voucher आणले आहे. यामंध्ये १२८ रुपयांचा Talktime आणि २०० MB DATA दिला आहे. LOCAL आणि STD कॉलसाठी प्रति मिनिट ६० पैसे शुल्क दिले आहे.