महिला सुरक्षेसाठी निर्भया सखींना विशेष अधिकार : पोलीस अधीक्षक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  

महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीसांनी निर्भया पथकांची स्थापना केली आहे. या पथकातील निर्भया सखींना अधिक चांगले काम करता यावा यासाठी निर्भया सखींना विशेष अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली. या पथकांतर्गत बहुतांशी महाविद्यालयात निर्भया सखींची नेमणूक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f8d6d01-b387-11e8-a6a9-c185a5c952c6′]

निर्भया सखींसाठी निर्भया पथक व न्यू लॉ कॉलेज यांच्यावतीने महिला कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, डॉ. नितीन नायक, महेशकुमार जिनगर, मनिषा कोरे, संदीप तेली, सीमा पाटील, दीपक ताटे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अधीक्षक शर्मा बोलत होते. शर्मा म्हणाले, महाविद्यालय परिसरात होणारी छेडछाड, रोडरोमिओंबाबत माहिती पोलिसांना कळवण्यासाठी निर्भया सखींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B077X9B22T,B078TL3KR6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69251bc1-b382-11e8-b452-ebf03e75ef02′]

या कार्यशाळेतील निर्भया सखींना मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे म्हणाले, निर्भया पथकातील अधिकारी, कर्मचारी शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे येथे साध्या वेशात गस्त घालत असतात. त्याशिवाय बसमध्येही प्रवास करून हुल्लडबाजांवर कारवाई केली जात आहे. यावेळी न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या पूजा नरवाडकर यांनीही कौटुंबिक हिंसाचाराबाबत मार्गदर्शन केले. अ‍ॅड. मनिषा काळे यांनी लैंगिक अत्याचाराबाबत तर प्रा. अहेर यांनी महिलाविषयक कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी