‘कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार मारला हे चांगले झालं’ : उज्ज्वल निकम

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशामधील कुख्यात गँगस्टर विकास दुबे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार मारला गेला. हे चांगलं झाले आहे, मात्र दुर्दैवाने या एन्काऊंटरबाबत अनेक प्रश्न निर्माण करत काही व्यक्ती राजकारण करत आहेत, याचं दुःख होत आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत ज्युडिशनाल इन्क्वायरी सुरू आहे. या चौकशीत हा एन्काऊंटर बनावट की खरा होता ?, हे समोर येईल. परंतु तोपर्यंत पोलिसांचे मनोबल आपल्याला तोडता येणार नाही.

मात्र, काही लोक जरी म्हणत असले की, विकास दुबे हा उज्जैनला शरण आला होता. पण, शरण आलेली व्यक्ती पोलिसांवर गोळीबार का करेल ? पण, त्या लोकांना हे माहिती नसावे की विकास दुबे हा सराईत गुन्हेगार होता.

आठ पोलिस कर्मचाऱ्यांना मारल्यानंतर तो उज्जैनला पळाला. याला कारण यात राजकारणही असेल किंवा राजकीय लोक किंवा एक्झिक्यूटिव्ह लोक यांच्याशी त्याचे साटेलोटेही असेल. परंतु आज विकास दुबे मारला गेल्याने सामान्य जनतेला आनंद झाला आहे. परंतु हा एन्काऊंटर खरा होता की खोटा होता ? याची शहानिशा होणे देखील आवश्यक आहे. कारण, लोकांचा न्यायालयावरील विश्वास कमी होता कामा नये.

8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला कानपूर येथे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. यात पोलिसांची गाडी उलटी झाली. त्यात पोलिसांसह विकास दुबेही देखील जखमी झाला. मध्यभागी बसलेल्या विकासने पोलिसांची बंदूक हिसकावून पाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात विकास दुबे मारला गेला.

पोलिसांच्या ताफ्याला सकाळी 6.15 वाजता झालेल्या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? विकास दुबेचा एन्काउंटर झाला की तो पूर्वनियोजित होता, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मध्यप्रदेशातील उज्जैन इथे गुरुवारी सकाळी महाकाल मंदिरातून विकास दुबेला अटक केली होती. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी केली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैन इथून कानपूरच्या दिशेने नेण्यात येत होते.

शुक्रवारी सकाळी 6.15 च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. याता ते वाहन उलटले. यात विकास दुबे मध्यभागी बसला होता. त्याने बाजूच्या पोलिसाची बंदूक हिसकवून जखमी अवस्थेत पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विकास दुबे याला सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानं ऐकलं नाही. उलट त्यांनं पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वबचावासाठी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार मारला गेला.