home page top 1

बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंची वाट ‘खडतर’, मुख्यमंत्र्यांनीच जागा सेनेला दिल्याचा ‘या’ नेत्याचा दावा !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप-शिवसेना युती झाली नाही तर, एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरमधून त्यांच्यासमोर शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांचं तगडं आव्हान असू शकेल. मागील निवडणुकीत अवघ्या 9 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

आधी विरोधी पक्ष नेते असणारे एकनाथ खडसे नंतर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात होते. सुरुवातीला त्यांच्याकडे तब्बल 12 खाती होती. कधीकाळी खडसे भाजपचे मातब्बर नेते होते. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे यांनी पांडुरंग चरणी बहुजन मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. यानंतर जणू त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक प्रकारे ओहोटीच लागली. अवघ्या 12 महिन्यात त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता. भाजपकडे आज खडसेंना एखाद्या साध्या आमदाराप्रमाणे तिकीटाची मागणी करावी लागते आहे.

भाजपमध्ये थेट मुख्यमंत्र्यांशीच पंगा घेतल्याने खडसे जणू एकाकी पडले आहेत. शिवसेनेनं मुक्ताईनगरच्या जागेवर दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ही जागा सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील करत आहेत. मुक्ताईनगरचे 6 वेळा आमदार राहिलेल्या खडसेंना आता सहानुभूती व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादीने पराभूत करण्याचं ठरवलं आहे. तब्बल 12 खाती सांभाळूनही त्यांनी मुक्ताईनगरसाठी काहीच केलं नाही असा आरोप रवींद्र पाटील यांनी केला आहे. रवींद्र पाटील हे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आहेत. यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अटीतटीची असणार आहे असं दिसतंय.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like