प्रवचनातून ‘प्रबोधन’ ते थेट साखर कामगारांचा ‘आर्थिक’ प्रश्नाला हात घालणारे ‘नगरकर’ महाराज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेतून महाराष्ट्रात प्रवचनातून समाज प्रबोधन कायमच केले गेले, जे आज देखील करण्यात येते. परंतू फक्त प्रबोधन करुन लोकांना विविध गोष्टींचे ज्ञान देणे. यापलीकडे जाणून याच प्रबोधनाच्या माध्यमातून थेट लोकांचे प्रश्न जाणून त्यांच्या समस्या सोडवणे देखील तेवढेत महत्वाचे असते. असेच महत्वपूर्ण काम करत आहेत ज्ञानश्री दादा महाराज नगरकर.

आध्यात्मिक कार्याकडून थेट प्रत्यक्ष कार्यात लक्ष देऊन त्यांनी उपस्थित केला तो साखर कामगारांचा प्रश्न, साखर कामगारांच्या समस्या. आध्यात्मिक दौरे करता करता ज्ञानश्री महाराज नगरकर यांच्या लक्षात आल्या त्या या साखर कामगारांच्या आर्थिक समस्या, ज्यात ते भरडले जात आहेत. याच प्रश्नकडे लक्ष घालण्याचे ध्येय ठेवून त्यांनी या साखर कामगारांची समस्या जाणून घेतल्या. यावर काम करण्यात सुरुवात करण्याआधी त्यांनी या क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ञांची भेट घेतली. पोलीसनामाशी बातचीत करताना त्यांनी त्यांच्या या मार्गदर्शकांचे आभार मानले. त्यांच्या या कार्यात हेच मार्गदर्शक त्यांच्या पाठिशी आहेत हे माझे भाग्य असल्याचे ते म्हणाले.

या साखर कामगारांच्या समस्या पाहून नगरकर महाराज्यांनी मागणी केली आहे की त्यांना मिळणारी पेंशन वाढवून द्यावी. सध्या साखर कारखान्यातून (निवृत्त) रिटायर झालेला या कामगारांना महिना १५०० ते २००० हजार पेंशन दिली जाते. आताची महागाई, लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी, उदरनिर्वाहाचा खर्च याचा विचार करता मिळणारी ही पेेंशन अत्यंत तुटपूंजी आहे. यामुळे राज्यातून या साखर कामगारांचे (ऊस तोडणी कामगारांचाही समावेश) हाल होतात. रोजचे जगणे हालाखीचे होते.

याच कारणाने नगरकर महाराज्यांनी मागणी केली आहे की या साखर कामगारांच्या पेंशनमध्ये वाढ करुन ती किमान १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात यावी. त्यांनी सांगितले की, यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणतीही भर पडणार नाही. कारण हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो.

या पेंशन वाढीमुळे साखर कामगारांना थोडा दिलासा मिळेल आणि त्यांच्या समस्या तरी सुटतील. एवढेच नाहीत तर या कामगारांचे इतर अनेक गंभीर प्रश्न आहेत, त्यांच्या आर्थिक समस्या सुटल्या तर इतर प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

आरोग्यविषयक वृत्त –