…म्हणून पार्थ पवारांना दिली उमेदवारी : खा. प्रफुल पटेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. राज्यात पवार हा ब्रँड आहे त्यामुळेच मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हंटले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपच्या मै भी चौकीदार या मोहिमेवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसात हलक्या भाषेत प्रचार करत आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला असे बोलणे शोभत नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशी अशोभनिय वक्तव्ये करणे चुकीचे आहे. आणि आता मै भी चौकीदार ही काही पक्षाची थीम आहे का ? ही काही पक्षाची थीम असू शकत नाही. उलट मोदींच्या अशा हलक्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदाच होईल. असे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हंटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यंत्रणांनी कोणतेही पुरावे दिले नसताना थेट विरोधी पक्षांवर कसा काय आरोप करतात ? असा सवाल करत, पंतप्रधानांकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्यांचे हे दबावतंत्र चुकीचे आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात लोकसभा-राज्यसभेचा दर्जा खाली घसरला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत त्यांना विचारले. त्यावेळी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. लोकसभेसाठी पार्थ पवारांचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेतही होते. लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्याचे काही निश्चित नव्हते. केवळ अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. तर राज्यात पवार हा ब्रँड आहे आणि त्यामुळेच मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर आणि पक्षाला जर पार्थच्या नावाचा फायदा झालाच तर पक्षासाठी चांगलेच आहे. असेही त्यानी म्हंटले.