हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजकाल धावपळीच्या जीवनामुळे हृदयावर जास्त ताण येतो. यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे दूर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. काही सामान्य गोष्टी जरी पाळल्या तरी हृदय निरोगी ठेवता येते. आहारात केलेल्या बदलांमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारांपासून बचाव करता येऊ शकते.

अशी घ्या काळजी

१) उच्च रक्तदाबाच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. यासाठी दिवसभरातून कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

२) जेवणात मिठाचे प्रमाण कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मिठाचे जास्त सेवन केल्याने याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. शरीरात मिठाचे प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

३) डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे सप्लिमेंट्स घेणे हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी सोपी पद्धत आहे.

४) योगासने आणि अध्यात्माच्या मदतीने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे तणावही कमी होण्यास मदत होते. कारण तणावामुळे हृदयविकारांचा धोका अप्रत्यक्षरीत्या वाढतो.

५) व्यसन करणे टाळा. याचा थेट परिणाम हृदयावर होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

You might also like