‘कोरोना’नं केलं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचं काम ‘तमाम’ ? ट्विटरवर मीम्स ‘बेलगाम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे, पण आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमलाही कोरोनाने आपला शिकार बनवला आहे. गेल्या काही तासांपासून काही माध्यम संस्थांचा असा दावा आहे की, भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिमचा मृत्यू पाकिस्तानच्या कराची येथे कोरोना विषाणूमुळे झाला आहे. दाऊदच्या मृत्यूशी संबंधित दाव्यांनंतर # दाऊद ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काही लोक ही चांगली बातमी म्हणत आहेत, तर काही लोक यावर विनोदी कमेंट करत आहेत. काही ट्विटर युजर्स पूर्वीप्रमाणे या बातमीला चुकीचे म्हणत आहेत, तर काही लोक याला सत्य सांगत आहेत. काही युजर्स माध्यमांच्या या अनिश्चित बातमीवरही प्रश्न विचारत आहेत.

कोरोना ने कर दिया दाऊद का काम तमाम?, ट्विटर पर मीम्स बेलगाम

कोरोना ने कर दिया दाऊद का काम तमाम?, ट्विटर पर मीम्स बेलगाम

आम्ही दाऊदशी संबंधित अशा कोणत्याही माहितीची पुष्टी देत नाही. दाऊद इब्राहिम हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार होता. या झालेल्या बॉम्बस्फोटात 350 हून अधिक लोक ठार झाले तर हजारो जखमी झाले होते. भारतात सर्वाधिक वॉन्टेड घोषित झाल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये गेला आणि त्याने तेथे आश्रय घेतला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या भीतीने पाकिस्तान लष्कराने त्याला आपल्या संरक्षणाखाली ठेवले आहे.

कोरोना ने कर दिया दाऊद का काम तमाम?, ट्विटर पर मीम्स बेलगाम

कराची येथे राहणारा दाऊद इब्राहिमला आयएसआय आणि सैनिकी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तथापि, पाकिस्तान सरकारने तो तेथे असल्याचे जाहीरपणे नाकारले आहे. जगातील इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानवरही कोरोनाचा वाईट परिणाम झाला आहे. पाकिस्तानमध्ये संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 89 हजार 249 वर पोहोचली आहे, तर या साथीच्या आजारामुळे तेथे 1838 लोकांचा मृत्यू झाला आहे. कदाचित हेच कारण आहे की, दाऊद इब्राहिमच्या कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

कोरोना ने कर दिया दाऊद का काम तमाम?, ट्विटर पर मीम्स बेलगाम