मृत्यूनंतरही बनू शकता ‘विक्की डोनर’, स्पर्म डोनेशनवरून होतेय ‘ही’ मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वंध्यत्वाची समस्या असल्यानं मुलं जन्माला घालण्याची इच्छा अपूर्ण रहाते. अशावेळी डॉक्टर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं स्पर्म महिलेच्या गर्भात इंजेक्ट करतात आणि यानंतर महिलेला मातृत्वाचा आनंद घेता येतो. सध्या ब्रिटनमध्ये स्पर्म डोनेशनची मोठी समस्या समोर आल्याचं दिसत आहे.

एका रिपोर्टनुसार, सरकारी आकडेवारीनुसार, ब्रिटनमधील स्पर्मची कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी डेन्मार्कमधून जवळपास 3000 आणि अमेरिकेतून जवळपास 4000 सॅम्पल्स मागवण्यात येत आहेत. याशिवाय तिथे फर्टिलिटी क्लिनीक उघडण्याची गरजही भासत आहे. वैज्ञानिकांनी एका असा मार्ग सुचवला आहे ज्यामुळे ब्रिटनच नाही तर संपूर्ण जगातील स्पर्म डोनेशनची समस्या दूर होईल.

जर्नल ऑफ मेडिकल एथिक्समध्ये प्रकाशित झालेल्या एका सूचनेत असं म्हटलं आहे की फर्टिलिटी क्लिनीकला मृत व्यक्तीच्या शरीरातून स्पर्म काढण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. मृत व्यक्तीचे स्पर्म महिलेच्या गर्भात पोचवण्यात काहीही धोका नाही. परंतु हे स्पर्म घेण्याआधी त्याची तपासणी नक्कीच व्हायला हवी. मॅंचेस्टरचे प्रसिद्ध डॉक्टर जोशुआ पार्कर यांनीही हा चांगला पर्याय आहे असं म्हटलं आहे. पार्कर म्हणतात, “पुरुषांनी स्वेच्छेने स्पर्म डोनेट करण्यासाठी पुढे यायला हवं. यामुळे मेल्यानंतर त्यांच्या शरीरातील शुक्राणूंचा वापर केला जाईल.”

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मृत्यूनंतर स्पर्म डोनेट करणं तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिक आहेच शिवाय नैतिकदृष्ट्या स्विकार्यदेखील आहे. व्यक्तीच्या शरीरातून अशा प्रकारे स्पर्म काढण्याच्या प्रक्रियेला मेडिकल भाषेत इलेक्ट्रोएजॅकुलेशन असं म्हणतात. यानंतर IVF किंवा इंट्रायुट्रीन इन्सेमिनेशन प्रक्रियेद्वारे पुरुषांचं स्पर्म महिलेच्या गर्भात इंजेक्ट केलं जातं. परंतु हे स्पर्म हेल्दी असणं आणि जीन्सकडून स्विकार्य आहे काय हे तपासून पाहणं गरजेचं आहे.

आतापर्यंत अशीही अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्याच्या शरीरातून स्पर्म काढण्यात आले आहेत यानंतर ते महिलेच्या गर्भात इंजेक्ट करण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –