महिलांचे शरीर ‘स्पर्म’ कसे स्वीकारते? रिसर्चमधून समोर आली डोळे विस्फटणारी अन् आश्चर्यकारक बाब, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रत्येक महिलेसाठी प्रेग्नंट होणे काही सोपी प्रक्रिया नसते. यामध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी घडत असतात. स्पष्ट आहे की कुणीही महिला पुरुषाच्या स्पर्म किंवा शुक्राणुंशिवाय प्रेग्नंट राहू शकत नाही. मात्र, नवीन स्टडीमधून समजले आहे की, प्रेग्नंसीत थेट भूमिका शिवाय सुद्धा स्पर्म आणखी एक अतिशय महत्वाचे काम करतात. हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या एडिलेड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे.

हे संशोधन नेचर रिसर्च जर्नल कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधनानुसार, स्पर्मच महिलेला प्रेग्नंट राहण्यासाठी तयार करते. स्पर्म महिलांच्या प्रजनन ऊतींना एक असा संकेत देतात ज्यामुळे गरोदर राहण्याची शक्यता वाढते.

संशोधनाच्या मुख्य लेखक प्रोफेसर सारा रॉबर्टसन यांनी म्हटले, हे पहिले संशोधन आहे जे सांगते की, महिलांचा इम्युन रिस्पॉन्स स्पर्मकडून मिळालेल्या सिग्नलवर काम करतो आणि एक एग फर्टिलाइज करण्याची परवानगी देते, ज्यामुळे प्रेग्नंसी होते.

प्रोफेसर रॉबर्टसन यांनी म्हटले, स्पर्मबाबत हे संशोधन आपल्या सध्याच्या समजूतीच्या उलट आहे, जसे की, आतापर्यंत आपण याची क्षमता समजत आलो होतो. यामध्ये केवळ जेनेटिक मेटेरियल नसते, तर हे महिलेच्या शरीराला हे समजावण्याचे सुद्धा काम करते की, तिने त्यांच्यात आपली प्रजनन क्षमता वापरावी.

स्पर्ममध्ये आढळणारे प्रोटीन प्रेग्नंसीच्या वेळी महिलेच्या प्रतिकारशक्ती (इम्यून) ला नियंत्रित करते जेणेकरून तिच्या शरीराने बाहेरील भ्रूणाला स्वीकारावे. मात्र, स्पर्म या प्रतिक्रियेला प्रभावित करता किंवा नाही, हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

संशोधकांच्या टीमने ग्लोबल जीन समजून घेण्यासाठी उंदरांच्या यूट्रसवर प्रयोग केला. यासाठी त्यांनी पूर्णपणे ठिक आणि काही नसबंदीवाल्या स्पर्मचे यूट्रसमध्ये फलन केले. प्रयोगात आढळले की, पूर्णपणे ठिक स्पर्ममुळे महिला जीनमध्ये जास्त बदल झाले, विशेष करून इम्यून रिस्पॉन्सच्या बाबत.

संशोधनानुसार नसबंदीवाल्या पुरुषांच्या तुलनेत विना नसबंदीवाल्या पुरुषांच्या स्पर्मने महिलांना मजबूत इम्यून टॉलरेंस मिळतो. संशोधनकांना आढळले की, महिलांच्या पेशींमध्ये स्पर्मचा थेट परिणाम होतो.

नवीन संशोधनाच्या निष्कर्षावरून समजते की, स्पर्मच्या निरोगी असण्याचा सुद्धा प्रेग्नसीवर परिणाम होतो. हे केवळ प्रेग्नसीसाठी नव्हे तर मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. वय, डाएट, वजन, दारू आणि स्मोकिंग सारख्या सवयींचा स्पर्म क्वालिटीवर परिणाम होतो आणि यामुळे प्रेग्नेंसी हेल्थ सुद्धा प्रभावित होते.

प्रोफेसर रॉबर्टसन यांनी म्हटले, असे मानले जाते की, स्पर्म केवळ एग फर्टिलाइज करतात, परंतु प्रेग्नंसीशिवाय स्पर्म क्वालिटीचा परिणाम प्रेग्नंसीच्या दरम्यान महिला आणि होणारे मुल यांच्या अरोग्यावरही परिणाम होतो.

प्रोफेसर रॉबर्टसन म्हणाल्या, मिसकॅरेज, प्रीक्लेम्पसिया आणि वेळेपूर्वी मुलाला जन्म देण्याच्या स्थिती महिलांच्या इम्यून रिस्पॉन्समुळे होतात आणि यामध्ये पार्टनरचे स्पर्मसुद्धा जबाबदार असतात.