दुबईला जाणा-या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूर येथून दुबईला जाणा-या स्पाईस जेट एसजी ५८ विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात १८९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगनंतर प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानाचे टायर फुटल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

विमानाचे टायर फुटल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास जयपूर येथून दुबईला जाणा-या विमानाने उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्याने तर काही वेळातच विमानाचे इमर्जन्सि लँडिंग करण्यात आले. उड्डाण घेताना विमानाचे एक टायर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला.

स्पाईस जेटच्या एसजी ५८ जयपूर-दुबई या विमानाने सकाळी साडेनऊच्या सुमारास उड्डाण घेतले. उड्डाण घेताना विमानाचे एक टायर फुटल्याचे पायलटच्या लक्षात आले. अखेर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त –

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘