आता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’, ‘स्पायसजेट’ सुरू करतोय ही खास सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) परवडणारी एअरलाईन्स कंपनी स्पाइसजेटला ड्रोनद्वारे ई-कॉमर्स पार्सल वितरणाची परवानगी दिली आहे. डीजीसीएने दिलेल्या या मंजुरीनंतर स्पाजजेट ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स पार्सल, वैद्यकीय, फार्मा आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास सक्षम असणार आहे.

स्वस्त दरात वितरण केले जाईल
स्पाइसजेटने शुक्रवारी सांगितले की, “स्पाइसएक्सप्रेसच्या चाचण्या व मंजुरी मिळाल्यानंतर स्वस्त दरात ड्रोनमार्फत या वस्तूंचे वितरण केले जाईल.” स्पाइसएक्सप्रेस कंपनी स्पाइसजेटची मालवाहू युनिट आहे.

स्पाइसएक्सप्रेसच्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्टियमने रेग्युलेटरला याबाबत प्रस्ताव सादर केला होता म्हणजे तो ‘बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साइट’ (बीव्हीएलओएस) ऑपरेशनचा प्रयोग करु शकेल. हे ऑपरेशन रिमोट पायलट चालविणाऱ्या विमानांसाठी असेल. नुकतीच डीजीसीएने या संदर्भात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) मागितले होते. बीव्हीएलओएसच्या मूल्यांकन आणि देखरेख समितीच्या अहवालावर आधारित अशा ऑपरेशन्ससाठी स्पाइसएक्सप्रेसला मान्यता देण्यात आली आहे.

BVLOS म्हणजे काय?
ड्रोन इंडस्ट्रीच्या क्षेत्रात बीव्हीएलओएसची बरीच चर्चा ऐकायला मिळाली आहे. जगातील अनेक देश त्यांच्या ड्रोन पॉलिसीमध्ये सुधारणा करीत आहेत जेणेकरुन मानव रहित हवाई वाहने (यूएव्ही) जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उडवू शकतील. BVLOS फ्लाइट्स व्हिज्युअल रेंजच्या पलिकडे देखील उड्डाण केली जाऊ शकतात. तसेच हे ड्रोनला अधिक अंतर व्यापण्यास मदत करते. हे बर्‍याच प्रकारे वापरले जाऊ शकते आणि ते खूपच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर देखील आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like