खुशखबर ! फक्‍त ८८८ रूपयांमध्ये करा ‘विमान’वारी, जाणून घ्या तिकीट प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वस्त विमान प्रवास देणाऱ्या एअरलाइन स्पाइसजेटने डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमान सेवा देण्यासाठी मान्सून सेलची घोषणा केली आहे. स्पाइस मान्सून सेल अंतर्गत डोमेस्टिक म्हणजेच भारतात प्रवासासाठी तिकिटीची सुरुवात ८८८ रुपयांपासून होत आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ३४९९ रुपयांपासून तिकिट दराला सुरुवात होणार आहे. हा सेल २ जुलै ते ६ जुलै असणार आहे.

या दरम्यान करु शकता प्रवास –

स्पाइसजेट मान्सून सेलअंतर्गत २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत प्रवासाच्या काळात याचा लाभ घेऊ शकतात. या सेलची घोषणा या काळात केली जात आहे जेव्हा विमान इंधनाच्या दरात ५.८ टक्क्यांने कपात झाली आहे.
नियम आणि अटी –

– ही ऑफर कोणत्याही माध्यामातून तिकिटाचे बुकिंग केल्यास लागू होईल.

– सूट फक्त एका मार्गासाठी उपलब्ध असेल.

– ही ऑफर अन्य कोणत्याही ऑफर बरोबर जोडण्यात येणार नाही आणि ग्रुप बुकिंगवर लागू होणार नाही.

– साधारण कन्सलेशन चार्ज बरोबर भाडे रिफंडेबल असेल.

– ही ऑफर नॉनस्टॉप प्रवासासाठी लागू असेल.

– ही ऑफर प्राधान्यावर अवलंबून असेल, म्हणजे जे सर्वप्रथम येतील त्यांना ही ऑफर मिळेल.

– ब्लॅक आऊट तारखा लागू असतील.

५० टक्के डिस्काऊंट –

या ऑफरमध्ये सीट, जेवन, स्पाइसमॅक्स आणि अन्य वस्तूवर देखील ५० टक्के डिस्काऊंटची ऑफर देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना AMEX50 या प्रोमो कोडचा वापर करता येईल. स्पाइसमॅक्स सीटसाठी अमेरिकन एक्सप्रेस कार्डने पेमेंट केल्यास ५०० रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळेल.

स्पाइसजेच वेकेशनच्या ऑफरच्या अंतर्गत स्पाइसजेट मोबाईल अॅपने विमानाचे तिकिट बूक केल्यास १००० रुपयांच्या डिस्काऊंट देणारे हॉटेल वाऊचर मिळेल. हे वाऊचर तुम्हाला मेल आईडीवर पाठवण्यात येईल. ही ऑफर ३१ ऑगस्टपर्यंत लागू असेल.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती

लोकसभा निवडणूकीत वंचितला डावलणाऱ्या कॉंग्रेसची विधानसभेसाठी ३ जूलैला ‘बोलणी’