SpiceJet ची शानदार ऑफर, 899 रुपयांत करा हवाई सफर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – ‘स्पाइसजेट’ (SpiceJet) ने अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्‍यासाठी नवी ऑफर दिली आहे. स्पाइसजेटने (SpiceJet) यासाठी खास ‘Book Befikar Sale’ आणला असून देशांतर्गत प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. या सेलमार्फत बुधवार (दि. 13) तिकिट बुकिंग सुरू झाले असून याची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे. सेलद्वारे तिकिट बुकिंग केल्यास 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येणार आहे. आगामी दोन, चार महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासाचा विचार करणा-या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. .

स्पाइस जेट कंपनीच्या Book Befikar Sale’ मध्ये देशांतर्गत उड्डाणाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. याशिवाय कोणत्याही शुल्काशिवाय तिकिटांची तारीख बदलण्याची व रद्द करण्याची सुविधा देखील दिली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत स्वतंत्र तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे. या ऑफरची संपूर्ण माहिती विमान कंपनीने आपल्या www.SpiceJet.com या संकेतस्थळावर दिली आहे.

याबाबत स्पाइस जेट कंपनीने म्हटले आहे की, फ्लाइट व्हाउचरची किंमत बुक केलेल्या तिकिटाच्या बेस भाड्याइतकीच राहणार आहे. ग्राहक जेव्हा या सेल ऑफरद्वारे तिकिट बुकिंग करतात, तेव्हा त्याला प्रत्येक बुकिंगसाठी जास्तीत जास्त 1000 रुपयांचे व्हाउचर दिले जाणार आहे. हे व्हाउचर भविष्यात तिकिट बुकिंगसाठी वापरता येणार आहे. हे फ्लाइट व्हाउचर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वैध असतील. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे लागू असतील. या व्हाउचरला कमीतकमी 5,500 रुपयांच्या व्यवहाराच्या रक्कमेसोबत नव्याने बुकिंगवर पूर्तता केली जाऊ शकते. दरम्यान, ही सूट केवळ एकतर्फी भाड्यावर लागू होईल. ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरबरोबर जोडली जाऊ शकत नाही किंवा ती ग्रुप बुकिंगवर लागू केली जाऊ शकत नाही, असे स्पाइसजेटने म्हटले आहे.