×
Homeमहत्वाच्या बातम्याSpicejet ची मोठी घोषणा ! कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास प्रवाशास मिळतील संपुर्ण पैसे...

Spicejet ची मोठी घोषणा ! कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास प्रवाशास मिळतील संपुर्ण पैसे परत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बजेट एअरलाइन्स कंपनी स्पाइसजेटने जाहीर केले आहे की प्रस्थान करण्याआधी प्रवासी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कंपनी त्यांना पूर्ण परतावा देईल. तथापि, यासाठी प्रवाशांना आरटी-पीसीआर(RT-PCR) टेस्टला SpiceHealth.com सोबत बुक करावे लागेल.

नमुन्यांना होम कलेक्शन पर्याय

ही सुविधा सध्या फक्त दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबई येथे उपलब्ध आहे आणि प्रवासी होम कलेक्शनचा नमुना हा पर्याय निवडू शकतात.

२९९ रुपयांत कोरोना टेस्ट

स्पाइसहेल्थ देशातील सर्वात स्वस्थ आरटी-पीसीआर टेस्ट फक्त २९९ रुपयांत देणार आहे. ज्याची बाजार किंमत ८५० रुपये म्हणजे तीन पट आहे. असे नाही की फक्त स्पाईसजेटचे प्रवासी या सुविधेचा वापर करू शकतात. या सुविधेचा वापर कोणताही व्यक्ती करू शकतो. परंतू त्यांना ४९९ रुपये द्यावे लागतील.

नोव्हेंबर २०२० पासून ही सेवा स्पाइसजेट देत आहे

स्पाइसहेल्थ ही एक हेल्थकेयर कंपनी आहे. ज्याची स्थापना स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंह आणि अवनी सिंह यांनी केली आहे. जे नोव्हेंबर २०२० पासून आरटी-पीसीआर टेस्टची सुविधा देत आहेत. २५ मार्चला स्पाइसहेल्थने केरळमध्ये मोबाईलमध्ये COVID-19 टेस्टिंग सुविधा सुरू केली आहे. ही सेवा आता हरियाणा, उत्तराखंड आणि महारष्ट्र सहित पाच राज्यांत उपलब्ध आहे.

Must Read
Related News