SpiceJet ची मोठी घोषणा ! आजपासून 42 शहरांसाठी मिळेल थेट विमानसेवा, जाणून घ्या मार्गासह इतर माहिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही विमान प्रवास (Air Travel) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. एयरलाईन कंपनी स्पाईसजेट (SpiceJet) आपल्या स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय नेटवर्कवर 42 नवीन उड्डाणे सुरू करणार आहे. एयरलाईन 10 जुलै, 2021 म्हणजे आजपासून आपल्या संचालनास सुरू वात करणार आहे. नवीन उड्डाणे मेट्रो आणि विना-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवतील. spicejet to launch 42 new domestic flights from today july 10 check routes and other details varpat

बजेट एयरलाईन कंपनी (Airline Company) ने अनेक मार्गावर थेट विमानांची (Direct Flights) घोषणा केली आहे. म्हणजे आता सूरतहून थेट जयपुर, हैद्राबाद, बेंगळुरु, जबलपुर, पुणेसाठी स्पाईसजेटने उड्डाण घेऊ शकता. याशिवाय, एयर बबल करारानुसार, स्पाईसजेट कोच्ची-माले-कोच्ची आणि मुंबई-माले-मुंबई मार्गावर अंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहे.

या मार्गावर विमान सेवा सुरू
सूरत-जबलपूर, सूरत-पुणे, सूरत-जयपुर, हैद्राबाद आणि बेंगळुरू. तर, ग्वाल्हेरला अहमदाबाद, मुंबई आणि पुणेशी जोडले जाईल. कंपनीनुसार, प्रवासी आता प्रमुख महानगरांमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील, ज्यामुळे व्यापार आणि सुट्टीचे प्रवासी दोन्हींना लाभ मिळेल. याशिवाय एयरलाईन कंपनीने आपल्या नेटवर्कवर पहिल्यांदा कोलकाता-पाटणा, पाटणा-सूरत, सूरत-पाटणा, पाटणा-कोलकाता, अहमदाबाद उदयपुर, उदयपुर-अहमदाबाद आणि बेंगळुरु-कोच्ची मार्गांवर उड्डाणे सुरू केली आहेत.

काय म्हटले कंपनीने?
स्पाईसजेट (SpiceJet) च्या मुख्य वाणिज्य अधिकारी शिल्पा भाटिया यांनी म्हटले, प्रवासाची मागणी वाढत आहे आणि सुट्टीचे प्रवाशी त्या बहुप्रतिक्षित लघु सुट्ट्यांसाठी बाहेर पाऊल ठेवत आहेत, आम्ही हे निश्चित करत आहोत की, मालेसारख्या सर्वात जास्त मागणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी काहीसाठी अनेक सुविधाजनक उड्डाणाचा पर्याय उपलब्ध असेल.

Web Title :  spicejet to launch 42 new domestic flights from today july 10 check routes and other details varpat

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव