वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरातील मसाले उपयुक्त

पोलिसनामा ऑनलाइन टीम – वजन जास्त नसले तरी असलेले वजन नियंत्रणात ठेवणे देखील महत्वाचे असते. यासाठी नियमित व्यायाम आणि काही घरगुती उपाय केल्यास वजन नियंत्रणात राहु शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाल्याचे पदार्थ खुप उपयोगी असतात. तसेच यामुळे इतर अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी कोणते मसाल्याचे पदार्थ उपयोगी आहेत, तसेच त्याचा वापर कसा करावा याविषयी आपण येथे जाणून घेणार आहोत.

रोज १ चमचा दालचिनीचे सेवन केल्याने वजन वाढत नाही. दालचिनी ब्लड शुगर कमी करून बॅड कोलेस्टेरॉलही कमी करते. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. मात्र, अधिक प्रमाणात दालचिनीचे सेवन करू नये. कारण यामधील कॉमरीन नावाच्या केमिकलमुळे लिव्हरला नुकसान होऊ शकते. तसेच काळे मिरे पचनशक्ती ठीक करून पोषक द्रव्यांना पचवण्यास मदत करतात. यातील पीपीराइन हे मेटाबॉलिझम वाढवण्यात उपयोगी ठरते.

काळे मिऱ्यांचे सेवन व्यवस्थितपणे करायचे असेल तर रोज एक चमचा काळ्या मिऱ्याची पूड घ्यावी. तिखटात असलेल्या कॅप्सेसिन नावाच्या घटकामध्ये फॅट बर्न करण्याची क्षमता असते. यात असणारे घटक सेंट्रल नर्व्हस सिस्टिमला शरीरात गरमी आणण्यासाठी उत्तेजित करतात. यामुळे लवकर कॅलोरी बर्न होते. तिखटातील कॅप्सेसिन भूक कमी करण्याचे काम करते.

मोहरीसुद्धा आरोग्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये आढळणारा घटक थर्मोजेनिकमुळे मेटाबॉलिझम वाढते. तसेच यामुळे फॅट बर्न होते. फक्त एक चमचा गरम मोहरीचे सेवन केल्याने पुढील काही तासांपर्यंत मेटाबॉलिझम २० ते २५ टक्के वाढलेले असते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.