कानपूरमध्ये ‘स्पायडर मॅन’ सारखा मुलगा, 7 वर्षाच्या वयात भिंतीवर ‘चढतो’ अन् ‘उतरतो’

पोलीसनामा ऑनलाइन : स्पायडर मॅन ! म्हटलं की आपल्याला आठवते तो हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट. त्या चित्रपटात स्पायडर मॅन हात पायांच्या मदतीने कोणतीही भिंत सहजपणे चढतो. इकडून तिकडे सहज उड्या मारताना दिसतो. असाच एक लहान स्पायडर मॅन कानपूरमध्येही एक आहे. धक्का बसला ना ऐकल्यावर? हो तो खूप लहान आहे. तो सात वर्षांचा असून त्याला एकदम वेगात भिंतीवर चढता त्याच वेगात खालीही उतरतो. या मुलाला अशा प्रकारे भिंतीवर चढताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

कानपूरमध्ये राहणारा येसार्थ सिंह अवघ्या 7 वर्षांचा आहे आणि सध्या तो तिसरीत शिकतो. येसार्थ कोणत्याही पाठिंब्याशिवाय स्पायडर मॅनसारखा भिंतींवर चढतो. हा 7 वर्षांचा स्पायडर बॉय म्हणतो की त्याने टीव्हीवर स्पायडर मॅन भिंती चढताना पाहिले. ज्यानंतर त्याने असे करावे हे त्याच्या मनात आले.
सात वर्षांचा येसार्थ सरळ भिंतींवर हात पाय ठेवतो आणि सहजतेने चढतो. येसार्थची आई गरिमा सिंह सांगतात की, त्याच्यावर स्पायडर मॅन सिनेमाचा प्रभाव आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतर त्याने भिंतींवर चढण्याचा सराव सुरू केला.

पुढे बोलताना येसार्थच्या आईने सांगितले की आम्हाला त्याची ही सवय पाहून खूप भीती वाटते, कारण त्याच्या कृतीत नेहमीच दुखापत होण्याचा धोका असतो. येसार्थला मोठं झाल्यावर IPS होण्याची इच्छाही आहे.