Coronavorus : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! 24 तासात 6088 नवे ‘पॉझिटिव्ह’ तर 148 जणांचा बळी, बधितांचा आकडा 118447 वर तर आतापर्यंत 3583 मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लॉकडाऊन ४ सुरु होऊन आता काही दिवस झाले तरी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या कमी न होता, दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक ६ हजार ८८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ इतकी झाली आहे. देशभरात गेल्या २४ तासात १४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून आतापर्यंत ३ हजार ५८३ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत प्रथमच एका दिवसात ६ हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून देशभरात २४ तासात साडेपाच हजारांहून नवीन कोरोना बाधित आढळून येत होते. या १ लाख १८ हजार ४४७ रुग्णांपैकी सध्या ६६ हजार ३३० हे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गेल्या २४ तासात १४८ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत ३ हजार ५८३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशभरातील रुग्णालयातून गुरुवारी दिवसभरात ३ हजार २३४ कोरोना रुग्ण मुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४८ हजार ५३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

You might also like