Coronavirus : देशात 24 तासात ‘कोरोना’चे 6535 नवे रुग्ण तर 146 जणांचा मृत्यु, 2770 झाले बरे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात गेल्या २४ तासात ६ हजार ५३५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ४५ हजार ३८० इतकी झाली आहे.
या कोरोना बाधितांपैकी ७७ हजार १०३ रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह असून देशातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासात देशभरात १४६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ४ हजार १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशभरात सोमवारी २ हजार ७७० रुग्ण हे बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण बरे झाले असून आता बरे होणार्‍यांचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी जवळपास निम्मे बाधित हे महाराष्ट्रात आढळून येत असून राज्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक पातळीवर जाऊन पोहचली आहे