Spinach Side Effects | पालक लोह-पोषक तत्वांचे भांडार, परंतु त्याचे जास्त सेवन हानिकारक; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Spinach Side Effects | उन्हाळ्यात हिरव्या भाज्या (Green Vegetables), विशेषत: पालक या पालेभाजीचे सेवन आरोग्यासाठी खुप फायदेशीर (Spinach For Health) मानले गेले आहे. पालक आयर्न हे जीवनसत्त्वांसह विविध प्रकारचे खनिज आणि पोषक तत्वांचे समृद्ध स्रोत मानले जाते, त्याचे सेवन केल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात (Spinach Side Effects).

 

ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी पालकही वरदानच आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की पालक जरी सर्व पोषक तत्वांचा खजिना असला, तरी काही परिस्थितींमध्ये मात्र आरोग्यासही हानी पोहोचवू शकतो ? आरोग्य तज्ज्ञ सांगतात, अधिक फायदे मिळवण्यासाठी रोज पालक खाल्ला तर त्यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते (Spinach Side Effects).

 

कोणतीही गोष्टी मध्यम प्रमाणात सेवन केल्यास फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास जास्त नुकसान होऊ शकते. पालकाच्या बाबतीतही असेच आहे, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की पालकाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे, विशिष्ट पोषक द्रव्यांच्या शोषणावर परिणाम होतो, त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकतात. पुढे सविस्तरपणे जाणून घेऊयात पालकाचे अधिक सेवन केल्याने शरीराला कसे नुकसान होऊ शकते (Side Effects Of Eating Too Much Spinach) ?

 

मूतखड्याचा त्रास (Kidney Problems) :
पालकापासून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी नियमित त्याचं सेवन करत राहिलात तर यामुळे किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असते. पालकात ऑक्सॅलिक अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वाधिक असते. जास्त पालक खाल्ल्याने कॅल्शियम-ऑक्सलेट तयार होते, ज्यामुळे मूत्रपिंडातील खड्यांची समस्या उद्भवू शकते. मूत्रपिंड ऑक्सलेट चांगले फिल्टर करण्यास सक्षम नसतात ज्यामुळे खडे तयार होऊ शकतात.

 

रक्तदाबाचा धोका वाढतो (Risk Of High Blood Pressure) :
पालकाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब औषधे, विशेषत: रक्त पातळ करणार्‍या औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. पालकामध्ये व्हिटॅमिन-के (Vitamin-K) ची उच्च पातळी असते, ज्यामुळे रक्त पातळ होण्याची क्षमता कमी होते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना स्ट्रोकच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी रक्त पातळ केले जाते. पालकाचे अतिसेवन या औषधांना निष्प्रभ करू शकते.

दुष्परिणाम (Side Effects) :
ऑक्सलेट-समृद्ध पदार्थांचे जास्त सेवन केल्याने खनिजांच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो. ऑक्सलेट एक अँटीन्यूट्रिएंट आहे. पालकामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, परंतु संशोधनात असे आढळून आले की,जास्त प्रमाणात पालक खाल्ल्याने कॅल्शियमसारख्या खनिजांच्या शोषणात देखील अडथळा येऊ शकतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात-हाडांशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.

 

पाचन समस्या (Digestive Problems) :
पालकाचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्याला पाचन प्रक्रियेशी संबंधित समस्या देखील येऊ शकते.
पालक पचवण्यासाठी शरीराला अधिक वेळ लागतो. पालकाच्या रोजच्या सेवनाने पोटात सूज, गॅस आणि पेटके येऊ शकतात.
पालकाचे सेवन जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याच्या अति सेवनामुळे शरीरात अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Spinach Side Effects | spinach side effects konw in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?

 

Diabetes Control | अचानक वाढली ब्लड शुगर तर तात्काळ करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

 

Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर